Pune : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे सागर पाटील यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे सागर पाटील यांचा सन्मान

पुणे : ढोल-ताशाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, भाषा आणि कलेला जागतिक स्तरावर पोचविणाकरिता दुबईस्थिती मराठमोळ्या सागर पाटील यांना ‘मराठी भाषा’ सन्मानाने गौरविण्यात आले आहे. दुबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पाटील यांचा सन्मान केला.

दिवाळीनिमित्त संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे जागतिक स्तरावरील ‘दुबई एक्स्पो २०२०’ या कार्यक्रमात विविध देशांनी सहभाग घेतला. यामध्ये सहभाग देश आपापल्या देशाची संस्कृती, संगीत, कलेचे प्रदर्शन या व्यासपीठावर करत आहेत. सागर पाटील हे दुबईमध्ये स्थायिक झाले असून त्यांनी स्थापित केलेल्या त्रिविक्रम ढोल-ताशा पथकाने ‘दुबई एक्स्पो २०२०’ मध्ये ढोल-ताशाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अद्भुत प्रदर्शन केले. त्यामुळे ढोल-ताशांचा आवाज फक्त महाराष्ट्रातच नाही, तर परदेशात ही घुमत आहे.परदेशात असलेल्या मराठी बांधवांची अजूनही आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी नाळ घट्ट आहे. म्हणूनच येथील संस्कृती आणि चालीरिती ढोल-ताशांच्या माध्यमातून जिवंत ठेवले आहे. त्याचबरोबर ही परंपरा अधिक वृद्धींगत केली आहे, असे सागर पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top