मंचरला कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 3 एप्रिल 2018

मंचर (पुणे): "वैद्यकीय, शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांची दखल पत्रकार संघाने घेतली आहे. त्यामुळे सामाजिक काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल,'' असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (पुणे): "वैद्यकीय, शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांची दखल पत्रकार संघाने घेतली आहे. त्यामुळे सामाजिक काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल,'' असे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे जीवन मंगल कार्यालयात आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांचा गौरव करण्यात आला. मंचर उपजिल्हा रुग्णालयात गरीब कुटुंबातील 15 वर्षांच्या मुलीच्या पोटातून दहा किलो मांसाचा गोळा शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला. त्यामुळे तिचा जीव वाचला. अत्यंत अवघड अशी ही शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख, डॉ. अंबादास देवमाने, डॉ. सदानंद राऊत, डॉ. संजय कुमार भवारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली जाधव, डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. वृषाली इमेकर, डॉ. मनीष मोरे यांनी केली. त्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचा, तर गुणवत्ता, क्रीडा, व्यवस्थापन, पर्यावरणपूरक काम, संगणक प्रयोगशाळा व समाजाभिमुख कामाची दाखल घेऊन अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड व बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव; तसेच पत्रकारितेत गेल्या तीस वर्षांपासून काम करणारे नंदकुमार कोरे (राजगुरुनगर), नितीन बारवकर (शिरूर), रामनाथ मेहेर (ओतूर), कुमार होनराव (अवसरी खुर्द), सुरेश साखवळकर (तळेगाव दाभाडे) या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, "सकाळ'च्या कार्यकारी संपादक शीतल पवार, "सकाळ'च्या मुख्य उपसंपादक नयना निर्गुण, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल, शरद पाबळे, डी. के. वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे उपस्थित होते.

Web Title: Honorable person in manchar