पुणे शहरात हुक्का पार्लर सुरूच

Hookah Parlour
Hookah Parlour

पुणे - राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातली असली तरी पुण्यात ती सर्रासपणे सुरू आहेत. तीही पोलिसांच्या नाकावर टिच्चून उघडपणे घरोघरी जाहिरात पाठवून. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात हुक्का पार्लर शहरातील अनेक भागांत उपलब्ध आहेत. 

मुंबईतील एका पबमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबईसह राज्यातील हुक्का पार्लरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर २०१८ मध्ये राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदीचा निर्णय घेतला. ही बंदी लागू केल्याबाबतची अधिसूचना गृहविभागाने काढली. त्यानुसार ‘सिगारेट व तंबाखू उत्पादनासंबंधी अधिनियम २००३’ या कायद्याअंतर्गत हुक्का पार्लरवर बंदी घालण्यात आली. त्यानुसार मागील वर्षभरामध्ये पुणे पोलिसांनी शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा या भागातील हॉटेलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर थेट कारवाईचा धडाका लावला होता.

गुन्हे शाखेच्या पथकासह परिमंडळ दोनच्या वतीने काही महिन्यांपूर्वी अनेक हुक्का पार्लरवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र आता ही कारवाई थंडावल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही हॉटेलचालकांकडून सर्रासपणे हुक्का पालर्र चालविण्यास सुरुवात झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती व गजबजलेल्या भागातील एका हॉटेलचालकाकडून हुक्का पार्लरची माहिती देणारे पत्रक घरोघरी पोचविण्यात आले आहे. त्यामध्ये हॉटेलचे नाव, हुक्का ओढण्यासाठीच्या किमतीचा उल्लेखही आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचा हा प्रकार पुणेकरांना चांगलाच खटकला आहे. अशा प्रकारामुळे महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या कुटुंबातील मुलांवर गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com