लोणंद मध्ये दोन मालट्रकचा भीषण अपघात; दोन ठार

रमेश धायगुडे
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

लोणंद : लोणंद- नीरा रस्त्यावर रेल्वे उड्डाण पूलानजीक गणेश पोलच्या गणेश मंदिरासमोर आज (ता.७) रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराम दोन मालट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. अपघातात दोन्ही ट्रकच्या दर्शनी बाजूंचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये दोन्ही ट्रकचे चालक आहेत.

उज्जैन मध्यप्रदेश येथून कोल्हापूर कडे कच्चे पोहे घेवून जात असलेला मालट्रक क्रमांक (एमएचपी-०९- एचएच-६७७७) व लोणंद बाजूकडून सिमेंट पोती भरून पुणेकडे निघालेला मालट्रक क्रमांक (एमएच-१२- एचडी-४९९८) यांची आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास लोणंद नीरा- रस्त्यावर रेल्वे उड्डाण पूला नजीक गणेश मंदिरा समोरच समोरासमोर धडक होवून हा भीषण अपघात झाला. त्यात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. झोपेमुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात समयी  मोठा आवाज झाला. दोन्ही ट्रकचे दर्शनी भाग एकमेंकांवर जोरदार आदळून एमेंकांच्यात घुसले होते. ट्रक मधील साहित्यही अस्थाव्यस्थ फेकले गेले

लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गिरिश दिघावकर व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेवून एकमेकांत आडकलेले ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करुन आणि ट्रक चालकांचे अडककलेले मृतदेह बाहेर काढून या मार्गावरील ठप्प झालेली वाहातूक पुर्ववत सुरू केली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना लोणंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे. लोणंद पोलिस अधिक तपास करत आहेत.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horrific accident due to two trucks hit ; Two killed