Accident News: रात्रीच्या अंधारात जीपनं 8 जणांना चिरडलं, भीषण अपघातात चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: रात्रीच्या अंधारात जीपनं 8 जणांना चिरडलं, भीषण अपघातात चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातामध्ये एका चिमुकल्यासह दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

नगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात भरधाव पिकअप जीपने दोन दुचाकीना उडवलं आणि हा भीषण अपघात झाला.

या अपघातात एकूण आठ जण चिरडले गेले आहेत. यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली आहे. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना कळवली. दरम्यानव अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी खाजगी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.