रुग्णालयातील रोखीच्या व्यवहारांचे "बायपास' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

पुणे - हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर दहाव्या दिवशी रुग्णालयांमधील रोखीचे व्यवहार "बायपास' झाल्याचे चित्र दिसले. रुग्णालयांची अवघी 20 टक्के बिले क्रेडिट, डेबिट किंवा ऑनलाइन पद्धतीने जमा केली जात होती. हे प्रमाण गेल्या दहा दिवसांमध्ये 80 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निरीक्षण रुग्णालयांतर्फे नोंदविण्यात आले. 

पुणे - हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर दहाव्या दिवशी रुग्णालयांमधील रोखीचे व्यवहार "बायपास' झाल्याचे चित्र दिसले. रुग्णालयांची अवघी 20 टक्के बिले क्रेडिट, डेबिट किंवा ऑनलाइन पद्धतीने जमा केली जात होती. हे प्रमाण गेल्या दहा दिवसांमध्ये 80 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे निरीक्षण रुग्णालयांतर्फे नोंदविण्यात आले. 

पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा 8 नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून चलनातून बंद होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर रुग्णालयांची बिले भरण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता; पण शहरातील काही खासगी आणि धर्मादाय न्यासांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयांनी 14 नोव्हेंबरपर्यंत पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारल्या; पण त्यानंतर केंद्राने वाढवून दिलेल्या मुदतीत खासगी रुग्णालयांचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे 15 नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्वीकारणार नसल्याची भूमिका शहरातील रुग्णालयांनी घेतली. त्याला पर्याय म्हणून क्रेडिट, डेबिट, ऑनलाइन याबरोबरच धनादेशाद्वारे बिल स्वीकारण्याचे पर्याय खुले करण्यात आले. त्याला रुग्णाच्या नातेवाइकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसत होते. 

शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांचे बिल रोखीने भरण्याकडे नातेवाइकांचा कल होता; पण गेल्या चार दिवसांपासून ऑनलाइन पद्धतीने बिल भरले जात आहे. यापूर्वी 20 टक्‍क्‍यांवर असलेले ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण आता 80 टक्के झाले असून, फक्त 20 टक्के पैसे रोखीने भरले जात आहेत. त्यात शंभर 

आणि दोन हजार रुपयाच्या नोटांचा समावेश असल्याचेही रुग्णालयांतर्फे सांगण्यात आले. 

सुरवातीला रुग्ण रोख पैसे घेण्याचा आग्रह करत होते; पण आता बहुतांश पैसे हे "प्लॅस्टिक मनी' किंवा ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहेत. 

- विजय यादव, केईएम रुग्णालय 

यापूर्वी रुग्णालयाच्या बिलाचे पेमेंट पूर्वी 60 टक्के रोख आणि 40 टक्के ऑनलाइन असे प्रमाण होते. ते गेल्या दहा दिवसांपासून 10 टक्के रोख आणि 90 टक्के कार्ड, ऑनलाइन आणि धनादेश असे झाले आहे. 

- के. व्ही. चंद्रन, बिलिंग विभागप्रमुख, रुबी हॉल क्‍लिनिक 

रुग्णालयाच्या बिलाचे पैसे खिशात घेऊन फिरण्यापेक्षा प्लॅस्टिक मनीच्या माध्यमातून व्यवहार करणे अधिक सुरक्षित आहे. 

- सागर कदम, रुग्णाचे नातेवाईक 

Web Title: Hospital cash transactions of bypass

टॅग्स