रुग्णालयाने मृत घोषीत केलेला रुग्ण जीवंत !

doctor
doctor

येरवडा - हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एक रुग्ण गेली सहा महिने डायलिसीसवर उपचार घेत होते. गेल्या आठवड्यात रुग्णाला डायलिसीस करताना त्यांची अचानक तब्येत बिघडली. रुग्णालयाने रात्री रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नातेवाईकांनी सकाळी अत्यंसंस्काराची तयारी केली. मात्र घरी आल्यानंतर रुग्णांने हालचाल केल्यामुळे त्यांना तातडीने ससून मध्ये उपचारासाठी दाखल केले. ते गेली चार दिवस ससून मध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिक आवाक झाले आहेत. 

येरवडातील श्रीरंग माने (नाव बदलले ) यांच्यावर गेली सहा महिने हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते. माने यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या उपचारावर सहा ते सात लाख रूपये खर्च केले. गेल्या आठवड्यात माने यांच्या डायलिसिससाठी टोचलेली सुई निघाल्यामुळे त्यातून रक्त बाहेर पडले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. रुग्णालय प्रशासनाने रात्री अचानक रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत्यू झाल्याचे घोषीत करून पावणे तीन लाख रूपये बील भरा असे सांगितले. यावर नातेवाईकांनी रुग्णाचा अचानक मृत्यू कसा झाला अशी विचारणा केली. यावर रुग्णालयाने त्यांचे बोळवण करून पंचवीस हजार रूपये भरा व तातडीने मृतदेह घेऊन जा असे सांगितले. 

रात्रीची वेळ असल्याने नातेवाईकांनी सकाळी मृतदेह घेऊन जात असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी नातेवाईकांनी श्रीरंग माने यांच्या अत्यंसंस्काराची तयारी केली. तर काही नातेवाईकांनी माने यांचा मृतदेह ताब्यात घेऊन ते रुग्णवाहिकेतून घरी आणले. दरम्यान नातेवाईक शोक करत असतानाच श्रीरंग माने यांच्या हाता पायाची हालचाल झाली. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी ते जीवत असल्याचे सांगितले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. 

यासर्व प्रकारामुळे माने यांच्या नातेवाईकांनी हडपसर येथील रुग्णालयाच्या हलगर्जीपणा बद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com