रेमडेसिव्हिरचा खेळखंडोबा कायम;अनामत रक्कम भरूनही रुग्णालयांना मिळेना इंजेक्‍शन 

रेमडेसिव्हिरचा खेळखंडोबा कायम;अनामत रक्कम भरूनही रुग्णालयांना मिळेना इंजेक्‍शन 

पुणे - कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी काही रुग्णालयांनाच रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन शुक्रवारी मिळता मिळेना. मागणीच्या तुलनेत जेमतेम 30 ते 50 टक्के इंजेक्‍शनच्या वायल मिळत असल्याने रुग्णांवर उपचार करायचे तरी कसे, इंजेक्‍शन पुरवठ्याचा काय खेळखंडोबा चालवलाय, असा सवाल रुग्णालयांनी केला. 

ऑक्‍सिजनवरील रुग्णांनाच रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन देण्याबाबतच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुरुवारी दिल्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी रेमडेसिव्हिरचा पुरवठा रुग्णालयांना होत नसल्याची माहिती पुढे आली. डेक्‍ट्रो कंपनीकडून थेट रुग्णालयांच्या नावाने इंजेक्‍शन पुरवठा होतो. पण, गेल्या आठ दिवसांपासून हा पुरवठा विस्कळित झाला. त्याचा थेट फटका रुग्णासेवेला बसत असल्याची तीव्र भावना रुग्णालयांनी व्यक्त केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नोबल रुग्णालयाचे डॉ. एच. के. साळे म्हणाले, ""औषधनिर्माण कंपन्यांकडे अनामत रक्कम जमा करून, इंजेक्‍शनची मागणी नोंदली आहे. पण, त्यानंतरही मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. पुण्यात इंजेक्‍शन आल्याच्या फक्त बातम्या येतात, पण रुग्णालयापर्यंत ते का पोचत नाहीत.''? 

रूबी हॉल क्‍लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे म्हणाले, ""रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन सहजासहजी उपलब्ध होत नाही. या इंजेक्‍शनसाठी दिवसभर पाठपुरावा करावा लागतो. रुग्णाला याचा फटका बसू नये, याची कसोशीने काळजी आम्ही घेत आहोत.'' 

भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी म्हणाले, ""शहरात गेल्या आठ-दहा दिवसांपासून हे इंजेक्‍शन मिळता मिळत नाही. मागणीच्या तुलनेत फक्त निम्मे इंजेक्‍शन मिळतात.'' 

रुग्णालयांना रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असे स्पष्ट करताना "एफडीए'च्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील म्हणाले, ""रेमडेसिव्हिरचा रोजच्या रोज नेमका किती साठा उपलब्ध आहे, याची नोंद रुग्णालयांनी करण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध केली आहे. हेक्‍ट्रो कंपनीच्या दहा हजार वायल शुक्रवारी आल्या आहेत. त्याचं वितरणही होणार आहे.'' 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णालयांनी 24 ते 48 तास पुरेल इतका इंजेक्‍शनचा साठा ठेवावा. त्यापेक्षा जास्त साठा करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नातेवाइकांना कशी मिळतात इंजेक्‍शन? 
शहरातील प्रमुख रुग्णालयांना पुरवठा न करता, दुसरीकडे कुठेतरी इंजेक्‍शन दिली जातात. त्यामुळे रुग्णालयांना मिळत नाहीत. पण, बाजारातून रुग्णाच्या नातेवाइकांना मिळतात, हे कसे होते, असा प्रश्न रुग्णालयांनी उपस्थित केला. 

सद्यःस्थिती काय आहे? 
एफडीएने दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरातील 30 रुग्णालयांमधून दीड हजार इंजेक्‍शन उपलब्ध आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com