आमच्यावरील निर्बंध अद्याप तसेच कशासाठी? हॉटेल व्यवसायिकांचा प्रश्‍न

कोरोनाबाबतचे नियम कडक केल्यापासून हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा पुरविण्याची परवानगी देण्यात आला आहे.
Hotel Business
Hotel BusinessSakal

पुणे - शहरातील सर्व दुकाने ठरावीक वेळेसाठी खुली करण्यास पालिका प्रशासनाने (Municipal Administrative) परवानगी (Permission) दिली आहे. तर मग आमच्यावरील निर्बंध अद्याप आहे तसेच का? व्यावसायिकांवर आलेल्या आर्थिक संकटाचा विचार करीत, आम्हाला हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने केली आहे.

कोरोनाबाबतचे नियम कडक केल्यापासून हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा पुरविण्याची परवानगी देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा व्यवसाय केवळ १० ते २० टक्क्यांवर आला आहे. तर शहरातील २० टक्के हॉटेल आत्तापर्यंत कायमस्वरूपी बंद पडले आहेत. त्यामुळे तेथील कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. हॉटेल बंद असल्याने जागेचे भाडे कसे भरायचे, कामगारांना पगार कसा द्यायचा व इतर दैनंदिन खर्च कसे भागवायचे, असा प्रश्‍न व्यवसायिकांना पडला आहे. त्यामुळे आता आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी हॉटेल व्यवसायिकांची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

Hotel Business
परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरात या ठिकाणी होणार कोव्हिशील्डचे लसीकरण

पार्सलसाठी असलेल्या वेळेतच हॉटेल सुरू करण्यास परवागनी द्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच हॉटेलमध्ये कामाला असलेल्या कामगारांना लस उपलब्ध करून द्यावी. त्यांचा खर्च करण्यास आम्ही तयार आहोत.

- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन

हॉटेल बंद असलेल्या कामगारांचे ‘इएसआयसी’चे पैसे अद्याप आम्हाला भरावे लागत आहेत. जीएसटी, वीजबिल आणि पालिकेच्या करांत कोणतीही सूट मिळालेली नाही. अनेक कामगार कायमचे गावे गेले आहेत. त्यामुळे हॉटेल सुरू झाल्यानंतर कामगारांचा प्रश्‍न राहणारच आहे. सूट काहीच नाही, निर्बंध मात्र कायम, अशी आमची स्थिती झाली आहे. त्यातून दिलासा मिळणे आवश्‍यक आहे.

- वैभव प्रभाकर, हॉटेल व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com