दिवसभरात हॉटेलात जेवण्यासाठी संख्या वाढती; मात्र उशिरा हॉटेलात जाण्यास अल्प प्रतिसाद

Hotel
Hotel

पुणे - शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्यानंतर ग्राहकांचा त्यास आत्तापर्यंत अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मात्र दिवसभरात हॉटेलात जेवण्यासाठी जाणा-यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे.

शहरातील हॉटेल व्यवसायाला चालना मिळण्यासह नागरिकांची सोय व्हावी म्हणून गेल्या आठवड्यापासून शहरातील हॉटेल व बार रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे हॉटेलच्या तुलनेत उशिरा बारमध्ये जाणा-यांची संख्या वाढली आहे. तर हॉलेटांमधील गर्दी देखील हळूहळू वाढत आहे. ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल हॉटेल व्यावसायिक विजय जाधवर यांनी सांगितले की, कोरोनापुर्वीचा विचार करता सध्या सुमारे 30 टक्के ग्राहक हॉटेलात जेवणासाठी येत आहे. पार्सल नेण्याची प्रमाण देखील थोडे वाढले आहे. जेवणासाठी येणा-यांमध्ये बॅचलर नोकरदार आणि विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर पूर्ण कुटुंब जेवणासाठी येण्याची संख्या कमी आहे. हळूहळू त्याचे प्रमाण वाढू शकले. दिवाळीनंतर व्यवसाय आणखी चांगल्या पद्धतीने सुुरू होईल, असा अंदाज आहे. नागरिक सर्व काळजी घेऊन हॉटेलात येत आहेत. प्रशासनाने दिलेल्या परवानगीमुळे आम्हाला नक्कीच दिलासा मिळाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रात्री नऊ वाजताच हॉटेल बंद होत असल्याने मला उशिरा आवडीच्या ठिकाणी जेवायला जाता येत नव्हते. मात्र आता उशिरापर्यंत हॉटेल सुरू राहत असल्याने गरमागरम जेवणाचा आनंद घेता येत आहे. हॉटेल चालक कोरोनाविषयक खबरदारी घेत असल्याचे दिसते. त्यामुळे जेवायला जाताना मनात भीती राहत नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com