हॉटेल-रेस्टॉरंटला ‘को-वर्किंग’चा आधार

कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर अनेक आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना केल्या. मात्र, प्रत्येकाला घरून काम करणे शक्य नसते.
Hotel
HotelSakal

पुणे - हॉटेल-रेस्टॉरंटचा (Hotel Restaurant) ७० ते ८० टक्के व्यवसाय संध्याकाळी सातनंतर होतो. मात्र, कोरोनाच्या नियमांमुळे संध्याकाळी हॉटेल सुरू ठेवणे मुश्‍कील झाले असून, दिवसा हॉटेलांतील गर्दी कमी असते. त्यामुळे यावेळेत बुडणारे उत्पन्न (Income) भरून काढण्यासाठी ‘को-वर्किंग स्पेस’चा (Co-Working Space) पर्याय उपयोगी ठरत आहे. तसेच, स्वतंत्र ऑफिस घेणे परवडत नसलेल्यांना को-वर्किंग स्पेस सोयीचे ठरत आहे. (Hotel Restaurant Coworking Support)

कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर अनेक आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना केल्या. मात्र, प्रत्येकाला घरून काम करणे शक्य नसते. त्यामुळे त्यांनी हॉटेलमधील को-वर्किंग स्पेसमधून काम सुरू केले आहे. आता तर काही बड्या कंपन्या कर्मचाऱ्यांना को-वर्किंग स्पेस उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे कोरोनामुळे बंद असलेल्या ठराविक हॉटेल-रेस्टॉरंटमधील गर्दी वाढू लागली आहे. तसेच, त्यातून या व्यवसायिकांना उत्पन्नाचा नवा व खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता को-वर्किंगच्या ठिकाणी घेतली जात आहे.

Hotel
पुणे महापालिकेत गावांच्या समावेशासाठी माजी सरपंचाचा २२ वर्षे लढा!

घरीच सुरू केले हॉटेलचे किचन

छोट्या ऑर्डरसाठी हॉटेल सुरू करून ते पदार्थ पुरवणे प्रत्येकाला परवडणारे नाही. त्यामुळे कमी ऑर्डर येणाऱ्या व्यावसायिकांनी घरीच हॉटेलचे किचन सुरू केले आहे. ऑर्डरचे पदार्थ घरच्यांच्या मदतीने तयार केले जात असल्याने खर्चात कपात होते. मात्र, यासर्वांत ग्राहकांना तीच चव मिळेल, याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे हॉटेलची लिंक कायम राहत असून व्यवसायिकांना पैसेही मिळत आहेत. काही व्यावसायिकांनी हॉटेल सुरू होत नाही, तोपर्यंत घरगुती मेस सुरू केल्या आहेत.

को-वर्किंग म्हणजे काय?

विविध कंपन्यांमधील कर्मचारी एकाच ठिकाणी (उदा. हॉटेल, रेस्टॉरंट, ऑफीस) काम करतात. त्याबदल्यात ते टेबल किंवा ठराविक जागेसाठीचे भाडे संबंधित अस्थापनेच्या मालकाला देतात. कामासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी कर्मचाऱ्यांना तेथे उपलब्ध करून दिल्या जातात.

कोरोनापूर्वी स्टार्टअप आणि कमी कर्मचारी असलेल्या कंपन्या ‘को-वर्किंग’चा वापर करीत. मात्र, आता मोठ्या कंपन्याही हॉटेल-रेस्टॉरंटच्या को-वर्किंगला पसंती देत आहेत. त्यामुळे अशा जागांचा वापर वाढला आहे. त्यातून हॉटेलांना उत्पन्न मिळत आहे. आमच्या स्टार्टअपच्या माध्यमातून स्पेस दिलेल्या हॉटेलांचे उत्पन्न १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे.

- योगेश थोरे, संस्थापक, फ्रायेई स्टार्टअप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com