''हा तर आमच्यासाठी काळा दिवस'' हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांची तीव्र नाराजी

Hotel restaurant professionals angry mini lockdown and new regulations
Hotel restaurant professionals angry mini lockdown and new regulations

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांसाठी ‘काळा दिवस’ आहे, असे सांगत युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन आणि पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन या हॉटेल व्यवसायिकांच्या संघटनेने निर्बंधांना विरोध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या विषयी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे म्हणाले, “मागील वर्षभरात लॉकडाउनचा परिणाम म्हणून शहरातील अनेक रेस्टॉरंट बंद झाली आहेत. जी सुरु आहेत, त्यांचा ५० टक्के देखील व्यवसाय होत नाही. अशा परिस्थितीत आणखी सात दिवस हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय जाचक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना आज भाडे भरण्याची देखील अडचण असून, व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अशी परिस्थिती असताना आजच्या बैठकीत लागलेल्या निर्बंधांमुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. इतर व्यापार, भाजी मंडई, दुकाने सुरु असताना हॉटेल व रेस्टॉरंट पूर्णपणे बंद ठेवणे म्हणजे आमच्या क्षेत्रावर अन्याय करण्यासारखे आहे.’’

हेही वाचा- 'लॉकडाउनमध्ये कृष्णकुंज मंत्रालय होतं, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं'

क्षेत्र टिकून राहणे शक्य नाही
कोरोनाची वर्षभरातील परिस्थितीवर लागलेल्या लॉकडाउनमुळे हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाउन संपले तरी आमच्यावर लागलेले निर्बंध मात्र कायम राहिले. इतकेच नाही तर ते अधिक कडक होत गेले. आम्हीही गेले वर्षभर तोटा सहन करीत काम करीत राहिलो. आता मात्र या क्षेत्राला टिकून राहणे शक्य नाही. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करण्यास तयार असून, आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशनचे सचिव दर्शन रावल यांनी केली.

इतके कनफ्युज मुख्यमंत्री बघितले नाहीत - मनसे

''हॉटेल बंद ठेवण्याच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे आमचे लक्ष आहे. गेल्या वेळी झालेल्या नुकसानीची आम्हाला काही भरपार्इ मिळाली नाही. करांत कोणतीही सवलत दिली नाही. या परिस्थितीतून सावरत असताना आता केवळ आमच्या पुरतेच नियम कडक करण्यात आले. मुळात फक्त हॉटेलसाठीच एवढे कडक निमय का, असा आमचा प्रश्‍न आहे. गर्दी होणार नाही असे नियोजन सर्वत्र करावे.''
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com