सफोशमुळे मिळाले हक्काचे घर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे : सफोश संस्थेमुळे मुलांना हक्काचे घर मिळाले आहे. मुलांच्या पालनपोषनाचे काम योग्यरित्या सुरू असून असे काम समाजासाठी प्रेरणादाई आहे. असे मत माजी नगरसेवक दिलीप उंबरकर यांनी व्यक्त केले.

मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवानिमित्त ससून रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उंबरकर बोलत होते. या कार्यक्रमात अनाथ मुलांना फळांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. उंबरकर यांच्यातर्फे आर्थिक मदतीचा धनादेशी प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद यांच्याकडे सुपर्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे कार्यकर्ते सतिश गायकवाड यांनी केले होते.

यावेळी अरविंद कोठारी, जयप्रकाश पुरोहीत, मुरलीधर जाधव, मनिष साळुंखे, महेंद्र शिंदे, गोरख दुपारगुडे, राजेंद्र कणबर्गे, किशोर कुटे, शैलेश लालबिगे, विजय झुंज, नंदू रणधीर, गणेश यादव, भिकन सुपेकर, राहूल कांबळे, शकील शेख, प्रताप सावंत आदी उपस्थित होते.

गेल्या 44 वर्षापासून सफोश संस्थेचे काम अथकपणे सुरू आहे. अनाथ मुलांना मायचे प्रेम देण्याचे काम संस्थेकडून होत असल्याची भावना प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद यांनी व्यक्त केली.सुत्रसंचालन सतिश गायकवाड यांनी केले तर पी.के. कुलकर्णी यांनी आभार मानले.

Web Title: The house of right to get