गृहिणी ते मसाला निर्यातदार

महेंद्र बडदे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - स्वत:च्या पायावर उभे राहण्याची महत्त्वाकांक्षा होती. तिला ‘लाइट हाउस’मुळे आत्मविश्‍वासाची जोड मिळाली... आज मसाले उत्पादन करीत आहे, त्याची परदेशातूनही मागणी वाढत आहे....चार जणींना रोजगार मिळाला... चिंचवड येथील वंदना पगार बोलत होत्या.... येरवडा येथील सुदर्शन चखाले या युवकालाही ‘लाइट हाऊस’ मुळे दिशा मिळाली... काय करिअर निवडावे, हे कळत नव्हते. वस्तीत राहत असल्याने मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते... आज मला रोजगार मिळालाय...आता एमएसडब्ल्यू करायचे, असे सुदर्शन आत्मविश्‍वासाने सांगतोय.

महापालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुरू केलेल्या ‘लाइट हाऊस’ या उपक्रमाचे लाभार्थी ठरलेले पगार आणि सुदर्शन यांच्याप्रमाणेच अनेकांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांतील १८ ते ३० या वयोगटातील युवकांना त्यांचे करिअर घडविण्यासंदर्भात या उपक्रमात मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमाचा वैयक्तिक जीवनात उपयोग करणारे पगार आणि सुदर्शन हे प्रतिनिधी आहे. येरवडा भागात राहणाऱ्या सुदर्शनचे वडील बॅंड पथकात काम करतात, तर आई ही घरकाम करते. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर तो तेथे गेला आणि त्याचे जीवनच बदलले, असे तो सांगतो. कला शाखेच्या तृतीय वर्षात तो शिक्षण घेत असून, त्याला आता ‘एमएसडब्ल्यू’ ही पदवी मिळवायची आहे. पगार या गृहिणी होत्या, आता त्या यशस्वी मसाले उत्पादक झाल्या आहेत. काही काळ ‘स्नॅक्‍स’ तयार करण्याचे काम त्या करीत होत्या. आता त्या मसाले उत्पादन करीत आहेत. इतर राज्यांसह परदेशातही त्यांनी मसाले पाठविण्यास सुरवात केली आहे.

   औंध, येरवडा, हडपसर आणि वारजे येथे ‘लाइट हाउस’ उपक्रम सुरू, महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांत प्रकल्प सुरू करण्याची योजना 

   दोन वर्षांत ४ हजार १०० युवकांनी प्रकल्पाचा लाभ घेतला, १ हजार ४०० जणांना कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केले असून, ८०० जणांना रोजगार मिळाला. महिलांचे प्रमाण ६० टक्के आहे. 

    समुपदेशन -  समुपदेशकांकडून कौशल्य विश्‍लेषण चाचणी केली जाते. संबंधित उमेदवाराची आवड, प्रतिभा, बाजारातील संधी ओळखून त्याला त्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

Web Title: House wife to Masala Exporter Success Motivation