शिवसेनेचे आव्हान विरोधक कसे पेलणार? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या शिवसेनेने प्रचारात दोन्ही कॉंग्रेसबरोबरच भाजपला टार्गेट केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानगुडे पाटील, विनायक राऊत यांच्या झालेल्या सभांमधून प्रामुख्याने ही गोष्ट निदर्शनास आली. त्यामुळे शिवसेनेने दिलेले हे आव्हान विरोधक कसे पेलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

गेल्या वेळेस झालेल्या महापालिका निवडणुकीत युतीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष मैदानात उतरले होते. यंदा मात्र युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले. दोन्ही कॉंग्रेस आणि भाजपकडून राज्य आणि देशपातळीवरील नेते प्रचारात सहभागी झाले; मात्र त्या तुलनेत शिवसेनेकडून फारसे नेते प्रचारात उतरले नाहीत; परंतु उद्धव ठाकरे यांच्या सभेने पक्षाची दिशा स्पष्ट केली आणि शिवसैनिकांमध्येही चैतन्य निर्माण झाले. ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर सडकून टीका केली. प्रचाराचे नियोजन आणि पक्षाचे संघटन यांच्या जोरावर गेल्या पंधरा दिवसांत शिवसेनेने प्रचारात रंग भरला. 

यासंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण म्हणाले, ""परिवर्तन तर होणारच. महापालिका निवडणुकीत शिवसेना एक नंबरचा पक्ष होणार आहे. शिवसैनिकांच्या बळावर महापालिकेवर भगवा फडकणारच.'' मुख्यमंत्र्यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून पुणेकरांनी भाजपला स्पष्टपणे नाकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा चिमटाही या वेळी त्यांनी भाजपला काढला. 

निम्हण म्हणाले, ""प्रचारादरम्यान पक्षाला आणि पक्षाच्या उमेदवारांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. दोन्ही कॉंग्रेसचा कारभार पुणेकरांनी पाहिला आहे. भाजपची लाट ओसरली आहे. पुणे शहराचा विकास कोण करू शकतो, तर फक्त शिवसेना. प्रचारात दोन्ही कॉंग्रेस आणि भाजपकडून शिवसेनेच्या विरोधात नेत्यांची मोठी फौज उतरविली. त्या उलट शिवसेनेकडून शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. सर्वसामान्यांच्या विरोधात धनदांडग्यांची लढाई आहे. त्यामुळे पुणेकर जनता सर्वसामान्यांच्या बाजूने उभी राहील, असा मला विश्‍वास आहे.'' 

Web Title: How to cope opposition Shiv Sena challenge?