esakal | पुण्यात कुठे मुसळधार, कुठे गारपीट; खडकवासला, वरसगाव, पानशेत ,टेमघरमध्ये किती झाला पाऊस?

बोलून बातमी शोधा

पुण्यात कुठे मुसळधार, कुठे गारपीट; खडकवासला ते टेमघर किती झाला पाऊस?

पुण्यात कुठे मुसळधार, कुठे गारपीट; खडकवासला ते टेमघर किती झाला पाऊस?

sakal_logo
By
शरयू काकडे

खडकवासला : वेल्हे तालुक्यातील साखर येथे ३६, मुळशीतील ताथवडे ३१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. भीमा खोऱ्यात ही पाऊस खडकवासला दोन, वरसगाव चार, पानशेत दोन, टेमघर तीन मिलिमीटर पाऊस पडला आहे. असे असले तरी काही भागात मुसळधार गारांचा पाऊस पडला आहे.

जल विज्ञान प्रकल्पाच्या संकेत स्थळावरील माहिती नुसार रात्री अकरा वाजेपर्यत झालेला पाऊस आहे. भीमा खोऱ्यातील आसणे ११, शिरकोली तीन, ओझर २८, मध १५ , भोर तालुक्यतील शिरगाव १२, वेल्हे पाच, घीसर दोन, शिरवली तीन, हिरडोशी दोन, कुरुंजे तीन मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हेही वाचा: आसूड मारून घेणाऱ्या पोतराज्यावर उपासमारीची वेळ

कृष्णा खोऱ्यात मोळेश्वरी 49, सोनत 29, नागेवाडी 24, रांजणी 21, नागठाणे 16, मालेवाडी १५, बामणोली 14, वळवण 11, उरमोडी 14, बेलवडे पाटण १६, चाफळ १० पडलोशी आठ, वाठार 22, अंबवडे 13, गोरेगाव वांगी 16, पारगाव पाच , सिद्धेवाडी चार, वारंगे १७, कास पठार आठ, महाबळेश्वर दोन, परळी दहा, गुढे आठ, खानापूर 19 मिलिमीटर पाऊस झाला आहे.