पु. ल. यांंच्या घरी चोरी करण्याऱ्याचा असा घेतला शोध 

पांडुरंग सरोदे
सोमवार, 25 जून 2018

"पु. ल. देशपांडे यांच्या सारख्या मोठ्या साहित्यिकाच्या घरी चोरीच्या प्रयत्नचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा तपास करणे आमच्यादृष्टिने आव्हानात्मक होते. त्याबाबत सातत्याने विचारणाही केली जात होती. भरपुर प्रयत्न केल्यानंतर आरोपी सापडला. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी आम्ही शोधत आहोत. एकजण यापूर्वीच्या एका प्रकरणात कारागृहात आहे."
- नितिन भोसले पाटील, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनीट 1

पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरी' ही घटना पोलिस प्रशासनाला ही आत्मचिंतन करायला लावणारी होती. साहजिकच या चोरीचा तपास करणे पोलिसांच्या दृष्टिने आव्हानात्मक होते. या प्रकरणी डेक्कन पोलिस व गुन्हे शाखेच्या युनीट एककडुन समांतर तपास सुरु होता. युनीट एकचे पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या पथकाने अतिशय बारकाईने तपासाला सुरवात केली. हजारो सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. घरफोडया करणाऱ्या अनेक चोरटयाची तपासणी केली. त्यामध्ये चोरी करणाऱ्याविषयीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरु होते. सुरवातीला मार्केटयार्ड, त्यानंतर हडपसर व निगडी येथे पोलिसांनी सापला रचला मात्र त्यांना यश आले नाही. अखेर दोन-तीन दिवसापुर्वी आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले.

क्रिकेट खेळत असताना केली आरोपीस अटक
पु. ल. यांच्या घरी चोरी करणारा आरोपी सध्या निगडी येथे राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापला रचला. संशयित आरोपी जितसिंग हा तेथील एका मैदानावर क्रिकेट खेळत असताना पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर संबंधित गुन्हा उघडकीस आला.

जितसिंग हा अल्पशिक्षित आहे. त्याचे कुटुंबीय हे वेल्डिंग व फैब्रीकेशनचा व्यवसाय करतात. जीतसिंग याने पु.ल च्या घरी चोरीचा प्रयत्न केला होता. तेथे त्यांना चोरुन नेन्यासारखे काहीच आढळले नाही.मात्र त्याच्या इतर साथीदारांनी डेक्कन परीसरात दोन,  बंडगार्डन व भोसरी परीसरात चोरीचे गुन्हे केले आहेत. दरम्यान प्रभात रस्ता येथे एका सदनिकेत चोरी केली होती. तेथील साडे पाच तोले सोने हस्तगत करण्यात आले. याबरोबरच एक संट्रो कारही ताब्यात घेण्यात आली आहे.

"पु. ल. देशपांडे यांच्या सारख्या मोठ्या साहित्यिकाच्या घरी चोरीच्या प्रयत्नचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा तपास करणे आमच्यादृष्टिने आव्हानात्मक होते. त्याबाबत सातत्याने विचारणाही केली जात होती. भरपुर प्रयत्न केल्यानंतर आरोपी सापडला. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी आम्ही शोधत आहोत. एकजण यापूर्वीच्या एका प्रकरणात कारागृहात आहे."
- नितिन भोसले पाटील, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनीट 1

Web Title: how police investigated PL Deshpande home in Pune