एचआरसीटी टेस्टचे दर निश्चित; अधिक दर आकारणाऱ्यांवर होणार कारवाई

मिलिंद संगई
Friday, 25 September 2020

राज्यातील कोविड व कोविड नसलेल्या रुग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर राज्य शासनाने काल निश्चित केले. कोविड रुग्णांना एचआरसीटी चाचणी करणे गरजेचे होते. अशा मध्ये अनेक ठिकाणी या तपासणीच्या दरात मोठी तफावत होती. या बाबत काही तक्रारी आल्यानंतर एचआरसीटी- चेस्ट तपासणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. 

बारामती (पुणे) :  राज्यातील कोविड व कोविड नसलेल्या रुग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर राज्य शासनाने काल निश्चित केले. कोविड रुग्णांना एचआरसीटी चाचणी करणे गरजेचे होते. अशा मध्ये अनेक ठिकाणी या तपासणीच्या दरात मोठी तफावत होती. या बाबत काही तक्रारी आल्यानंतर एचआरसीटी- चेस्ट तपासणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या समितीने या तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध क्षमतेची तपासणी यंत्रे, तज्ज्ञ, तांत्रिक व अतांत्रिक मनुष्यबळ, वीजबील, पीपीई किट व सॅनिटायझेशनसह इतर बाबी विचारात घेऊन विविध रुग्णालये व तपासणी केंद्र चालकांशी चर्चा करुन एचआरसीटी तपासणीचे दर निश्चित केले. 
यात 16 स्लाईस पेक्षा कमी तपासणीसाठी दोन हजार रुपये, मल्टी डिटेक्टर (एमडीसीटी) 16 ते 64 स्लाईस दरम्यानच्या यंत्रावरील चाचणीसाठी 2500 तर मल्टी डिटेक्टर (एमडीसीटी) 64 स्लाईसपेक्षा अधिकचच्या यंत्रावरील चाचणीसाठी तीन हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

या किंमतीत सीटीस्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सी. टी. फिल्म, पीपीई किट, डिसइनफेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी यांचा समावेश असेल. या दराहून कमी दरात कुणी तपासणी अगोदरपासून करत असेल तर कमी असलेले दरच लागू राहतील. ही तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या यंत्राद्वारे तपासणी केली हे नमूद करणे बंधनकारक असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही तपासणी करु नये, हे दर सर्व तपासणी केंद्रांनी लोकांना दिसतील अशा पध्दतीने दर्शनी भागात लावावे असेही निर्देश शासनाने दिले आहेत.

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

एचआरसीटी चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी राज्यस्तरावर राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व महानगरपालिकेत आयुक्त हे सक्षम अधिकारी असतील. ही दर आकारणी साथरोग कायद्याची अंमलबजावणी असेपर्यंत सुरु राहणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HRCT test rates fixed