Exam
Exam

शहरात बारावी परीक्षेसाठी २१ हजार १४२ विद्यार्थी

पिंपरी - बारावीची परीक्षा गुरुवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. शहरात २७ केंद्रांवर २१ हजार १४२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत व्हावी तसेच, कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत. 

परीक्षा केंद्रावर अडथळे निर्माण करणे, कॉपी साहाय्य केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी दिली. २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान बारावीची परीक्षा सुरू राहणार आहे. गुरुवारी इंग्लिशचा पहिला पेपर आहे. माध्यमिक विभागाचे स्वतंत्र भरारी पथक असणार आहे.  

अशी आहेत परीक्षा केंद्रे.. 
स्वामी विवेकानंद कॉलेज दापोडी (विद्यार्थी संख्या ः ८५०), नागनाथ मारुती गडसिंग, रुपीनगर (४०६), श्री फत्तेचंद जयहिंद हायस्कूल, चिंचवड (१९७४), महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी (१३९०), म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी (२२६९), कस्तुरीदेवी गुप्ता महाविद्यालय, मोरवाडी (९२९), श्री गोदावरी माध्यमिक विद्यालय चिंचवड (४७१), शिवभूमी विद्यालय निगडी (५२०), भैरवनाथ विद्यालय भोसरी (१७२८), श्री सयाजीनाथ विद्यालय दिघी (२२१), जयहिंद हायस्कूल पिंपरी (१३४०), प्रेरणा कनिष्ठ विद्यालय निगडी (८७६), सेंट उर्सुला आकुर्डी (३५५), डॉ. डी. वाय. पाटील पिंपरी (६५७), बालाजी कॉलेज ताथवडे (४५२), डॉ. डी. वाय. पाटील शाहूनगर (५९९), अभिषेक ज्युनिअर कॉलेज शाहूनगर (३७४), गायत्री इंग्लिश विद्यालय भोसरी (४०१), हनुमंतराव भोसले ज्युनिअर कॉलेज (६१३), रामचंद्र गायकवाड शाळा दिघी (५२५), बी. आर. घोलप महाविद्यालय सांगवी (६५०), नृसिंह विद्यालय सांगवी (४६९),  प्रतिभा कॉलेज चिंचवड (८७४), अनुसया वाढोकर विद्यालय निगडी (६३४),  सी. एम. एस. हायस्कूल निगडी (४२४), एम. एम. ज्युनिअर कॉलेज थेरगाव (५३५), राजमाता जिजाऊ महाविद्यालय, भोसरी (६००).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com