प्रवेशपत्र मिळणार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

बारावीतील विद्यार्थ्यांसाठी सुविधा; संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार
पुणे - बारावीच्या परीक्षेसाठी आवश्‍यक असलेले प्रवेशपत्र (हॉल तिकीट) या वर्षापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत देखील प्रवेशपत्र मिळू शकेल.

बारावीतील विद्यार्थ्यांसाठी सुविधा; संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार
पुणे - बारावीच्या परीक्षेसाठी आवश्‍यक असलेले प्रवेशपत्र (हॉल तिकीट) या वर्षापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत देखील प्रवेशपत्र मिळू शकेल.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यासाठी परीक्षा केंद्रावर जाताना प्रवेशपत्र आवश्‍यक असते. ते मिळण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी मंडळाने संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करण्याची व्यवस्था केली आहे. केवळ बारावीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र "डाऊनलोड' करता येणार आहेत.

राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले, 'बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावरून त्यांची प्रवेशपत्रे डाऊनलोड करता येतील. परीक्षेच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होतील. दहावीच्या विद्यार्थ्यांना सध्या ही सुविधा मिळणार नाही. भविष्यात मात्र त्यांना देखील प्रवेशपत्र संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिली जातील.''

'प्रवेशपत्रे ऑनलाइन मिळणार असली, तरी ते शाळेतून घेण्याची पारंपरिक पद्धत बंद केलेली नाही. ज्यांना ऑनलाइन शक्‍य त्यांना त्यांच्या शाळेतून प्रवेशपत्र मिळेल. प्रवेशपत्र हरविले, तरी विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळू वा घाबरू नये. विद्यार्थी ज्या शाळेत आहे, तेथे मुख्याध्यापक वा केंद्र संचालक यांना भेटल्यास नव्याने प्रवेशपत्र मिळू शकेल,'' असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हे आहे संकेतस्थळ
बारावीच्या परीक्षेला यंदा 15 लाख पाच हजार 365 विद्यार्थी बसेल आहेत. दहावीच्या परीक्षेस 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी बसले आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्र मिळेल, असे कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

Web Title: hsc exam hall ticket online