Rekha-Shirsath
Rekha-Shirsath

न्यूनगंडाचे रूपांतर जिद्दीमध्ये

बारा वर्षांनी पुन्हा शिक्षण सुरू करून बारावीत ७० टक्के
पुणे - ‘ति’चा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकत होता. अभ्यासात हुशार असल्याने नेहमी पहिला-दुसरा यायचा. त्याच्या शाळेत पालकसभांना गेल्यावर उच्चशिक्षित पालक, त्यांचे राहणीमान बघून ‘तिला’ नेहमी न्यूनगंड यायचा. मात्र त्याचे रूपांतर जिद्दीमध्ये करून ‘ति’ने पुन्हा शिकण्याचा निर्धार केला. त्याचे फलित म्हणजे बारावीमध्ये सत्तर टक्के मिळाले.

रात्रशाळेत शिकून रेखा शिरसाट यांनी बारावीमध्ये सत्तर टक्के गुण मिळवले आहेत. लहान वयात लग्न झाल्याने फक्त आठवीपर्यंतच शाळा शिकल्या. घरामध्ये महिलांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर पाठवायची परवानगी नव्हती. मुलांना मोठे करायचे म्हणून चांगल्या शाळेत घातले. जेव्हा मुलांच्या शाळेत जायची वेळ यायची तेव्हा मात्र उच्चशिक्षित पालक बघून त्यांना न्यूनगंड यायचा. मुलगा सहावीत असताना त्यांना म्हणाला ‘तुला लिहिता-वाचता यायला हवे.’ मुलानेच त्यांचे नाव आठवीच्या वर्गासाठी रात्रशाळेत घातले. तेव्हा त्यांनी मनाशी पक्के ठरवले, काही झाले तरी बारावीपर्यंत शिकायचेच. लग्नानंतर १२ वर्षांनी त्या पुन्हा शिक्षणाच्या वाटेवर आल्या.

पहाटे पाचला उठून स्वयंपाक करून दिवसभर नोकरी करायची. मग संध्याकाळी तीन तास रात्रशाळेत जायचे. दहावीला उत्तीर्ण झाल्यावर त्यांना आत्मविश्‍वास आला. अकरावीला वाणिज्य शाखा घेतली. बारावीमध्ये सुरवातीपासूनच अभ्यास केला. घराच्यांचा पाठिंबा असल्याने सहज अभ्यास होत होता. वर्षभर अभ्यास केल्याने परीक्षेच्या वेळी खूप ताण आला नाही. आताही त्यांनी मागे वळून न पाहण्याचे ठरवले आहे. या पुढे लॉ करून बॅरिस्टर व्हायचेच ही खूणगाठ बांधली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com