पुण्यात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त, एकाला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे - पुणे ग्रामीण पोलिस आणि एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत पिंपळवाडी येथे एका व्यक्तीकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. राजाराम किसन अभंग (वय 60, रा. अभंगवस्ती, पिंपळवाडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

ही व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमिची असून, त्याने यापूर्वी 2003 मध्ये बॉम्बस्फोट घडवून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तो तीन वर्षे येरवडा कारागृहात कैदेत होता. त्याच्याकडे अशाप्रकारे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळवाडी येथील राजाराम अभंग याच्याकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी अभंग याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब, तलवार, कोयता, भाले, बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक उपकरणे आदी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला. 

Web Title: A huge amount of arms seized in Pune one person got arrested