सोन्याची जेजुरी पाहा ड्रोनमधून (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

आज जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरली असून, लाखो भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केली आहे. गडावरून आज सकाळी आठ वाजता पालखीचे प्रस्थान झाले. त्यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची पालखीवर उधळण केली. दुपारी बाराच्या सुमारास देवाच्या मूर्तींचा कऱ्हा स्नानाचा कार्यक्रम झाला.

जेजुरी : खंडोबाचा गड आज (सोमवार) पिवळ्या सोन्याने (भंडारा) न्हाऊन निघाला असून, अक्षरशः जेजुरी गड सोन्याची जेजुरी दिसत आहे. सोमवती आमावस्यानिमित्त भाविकांनी जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण केली. याचे क्षण ड्रोन कॅमेऱ्यातून टिपले आहेत.

आज जेजुरीत खंडोबाची सोमवती यात्रा भरली असून, लाखो भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केली आहे. गडावरून आज सकाळी आठ वाजता पालखीचे प्रस्थान झाले. त्यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची पालखीवर उधळण केली. दुपारी बाराच्या सुमारास देवाच्या मूर्तींचा कऱ्हा स्नानाचा कार्यक्रम झाला. कऱ्हा नदी कोरडी पडल्याने, तसेच नाझरे धरणाचे पाणी दूरवर गेल्याने यंदा टँकरच्या पाण्याने देवांना स्नान घालण्यात आले.

सोमवती यात्रेच्या तयारीसाठी ग्रामस्थ मंडळ व देवसंस्थानचे पदाधिकारी यांनी नियोजन केले होते. मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, उपाध्यक्ष रमेशआबा राऊत, मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्‍वस्त शिवराज झगडे, विश्‍वस्त संदीप जगताप, पंकज निकुडे, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांचा प्रमुख सहभाग होता. सुटीच्या कालावधीत सोमवती यात्रा आल्याने, शेतकरीही मोकळा असल्याने यात्रेला मोठी गर्दी झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge number of devotees gather at Jejuri Temple for somvati amavasya