नववीच्या विद्यार्थिनींनी बनवली बॅटरीवर चालणारी सायकल

इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी बॅटरीवर चालणारी सायकल बनवत एक नवीन उपक्रम राबविला आहे.
hujurpaga school standard 9th student make electric cycle pune
hujurpaga school standard 9th student make electric cycle punesakal

कात्रज : इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी बॅटरीवर चालणारी सायकल बनवत एक नवीन उपक्रम राबविला आहे. लर्निंग लिंक इंडिया फौंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या स्टेम शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत लक्ष्मी रस्त्यावर असणाऱ्या हुजूरपागा शाळेतील विद्यार्थिनींनी या उपक्रमाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचा आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा अवलंब करून भविष्य घडवण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला आहे. या उपक्रमात सुहानी चव्हाण, गौरी शिंदे, तृप्ती शेलार, तनुश्री राणा, वसुंधरा कचरे, संस्कृती रेणुसे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.

या कामात विद्यार्थिनींना लर्निंग लिंक फाऊंडेशनचे वेदांत जोशी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, तसेच हुजूरपागा लक्ष्मी रोड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रंजना वाठोरे यांनीही या उपक्रमास मार्गदर्शन केले. हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी प्रशालेतील विज्ञान शिक्षिका श्रीमती मनीषा नहार यांनी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com