पुणे-मुंबई महामार्गावर मानवी साखळी; कामगार-शेतकरी उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहर परिसरातील सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. आज गुरुवार औद्योगिक सुटी असल्याने कामगारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.

पिंपरी : कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील कामगार रस्त्यावर उतरले आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर मानवी साखळी केली आहे. पिंपरी चौकापासून चिंचवड स्टेशन पर्यंत ही मानवी साखळी आहे.

'...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​

पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहर परिसरातील सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. आज गुरुवार औद्योगिक सुटी असल्याने कामगारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. कामगार कृती समिती अध्यक्ष कैलास कदम, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, व्ही. व्ही. कदम, एस. डी. गोडसे, टी. ए. खराडे, दिलीप पवार, वसंत पवार, किशोर ढोकले, अर्जुन चव्हाण, रघुनाथ कुचिक, इरफान सैय्यद, मनोहर गडेकर, अरुण बोराडे, अनिल रोहम, प्रसाद काटदरे, योगेश कोंढाळकर, अरविंद जक्का आदी कामगार नेते उपस्थित आहेत. 

Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!

पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलन सुरू झाले आहे. आंबेडकर स्मारक परिसर, पुणे मुंबई महामार्ग, मोरवाडी चौक लाल बावट्यांनी फुलून गेला आहे. कामगारांच्या हातात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधातील आणि मागण्यांचे फलक आहेत. महिला कामगारांची संख्याही लक्षणीय आहे. कामगारांचे निशान असलेल्या लाल रंगाचे मास्क आणि दंडावर काळ्या फिती लावून कामगार आंदोलनात उतरले आहेत. 

इंटक, आयटक, सिटू, एच ए मजदूर संघ, टीयूसीसी, एआययुटीयुसी, एआयसीसीटीयू, सेवा, युटीयुसी, श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, टाटा मोटर्स एम्लाॅईज युनियन, हिंद कामगार संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ आदी कामगार संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.


दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन​
 

(Edited by : Sharayu Kakade)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Human chain of workers on Pune-Mumbai highway to repeal anti-labor and anti-farmer laws