नारायणगाव
नारायणगावsakal

ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत आढळून आला मानवी पाय; नारायणगावातील घटना

आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेला जैविक कचरा बेकायदेशीर पणे टाकून देणाऱ्या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

नारायणगाव : नारायणगाव येथील बसस्थानका जवळील एका हॉस्पिटल मध्ये जेष्ठ व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून काढून टाकलेला मानवी पाय आज सकाळी ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत आढळून आला. या बाबत ग्रामस्थांमधून तिव्र संताप व्यक्त होत असून आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेला जैविक कचरा बेकायदेशीर पणे टाकून देणाऱ्या डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.

या बाबत माहिती अशी : आज सकाळी येथील एका हॉस्पिटलमधील जैविक कचरा बेकायदेशीर पणे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत टाकण्यात आला. या कचऱ्यात जेष्ठ व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून काढून टाकलेला मानवी पाय होता.ग्रामपंचायतिचे कर्मचारी कचरा खाली करत असताना ही बाब निदर्शनात आली. या बाबतची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्या नंतर पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

नारायणगाव
'राज्यपालांना लिहिलेलं पत्र अपरिपक्वतेचं लक्षण'

या बाबत पोलीस निरीक्षक देशपांडे म्हणाले येथील बसस्थानका जवळील एका हॉस्पिटल मध्ये जेष्ठ नागरिकाला उपचारासाठी दाखल केले होते. पायाला गँगरीन झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीचा पाय काढून टाकण्यात आला होता. हा पाय कचरा जमा करणाऱ्या ग्रामपंचायतिच्या घंटा गाडीत टाकण्यात आला.वास्तविक जैविक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकून देणे बेकायदेशीर आहे.या बाबत चौकशी सुरू आहे.प्राथमिक चौकशीत नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा पाय चुकून कचऱ्याच्या गोणीत टाकला गेला असल्याचा खुलासा डॉक्टरने केला असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com