फ्रान्समध्ये हृदयशस्त्रक्रियेनंतर अॅड. असीम सरोदे यांच्या प्रकृतीत सुधारणा

फ्रान्समध्ये हृदयशस्त्रक्रियेनंतर अॅड. असीम सरोदे यांच्या प्रकृतीत सुधारणा

पुणे : शहरातील वकिल असीम सरोदे (वय 45) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे. 

सरोदे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेसाठी फ्रान्समध्ये आहेत. दक्षिण फ्रान्समध्ये ग्रीन ओब्ले शहात ते आहेत. तेथून गुरुवारी (ता. 22) ते परतणार होते. परंतु, काही मित्रांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या मित्रांनी त्यांना जवळच्या युनिव्हर्सिटी आल्प्स ग्रेनोबेल या रुग्णालयात दाखल केले. तेथे सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. असीम सरोदे यांची प्रकृती आता स्थिर आहे.

सरोदे यांची अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी करण्यात आली. पुढील सहा दिवस त्यांना वैद्यकीय निगराणीत ठेवले जाणार आहे. तीन आठवड्यांनंतर पुन्हा तपासणी करून सरोदे यांना विमान प्रवासाची परवानगी दिली जाईल. सरोदे यांच्या पत्नी अॅड. रमा सरोदे या उद्या फ्रान्सकडे रवाना होतील. 

रमा सरोदे यांना व्हिसा मिळावा, यासाठी फ्रान्स दुतावासाशी संपर्क साधला आहे. आज सायंकाळपर्यंत व्हिसा मिळणे अपेक्षित आहे. तो मिळाल्यावर लगेचच रवाना होणार आहे, असे अॅड. रमा यांना 'सकाळ'शी बोलताना सांगितले. मानवाधिकार आणि पर्यावरण क्षेत्रातील घडामोडींचा अॅड. असीम यांचा अभ्यास आहे. असीम यांची प्रकृती सुधारत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com