धक्कादायक! अल्पवयीन मुलीला घरात डांबून ठेवलं, नंतर 11 हजारांना तिची विक्री केली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या १४ वर्षांच्या मुलीला ओळखीच्या एका महिलेने काही दिवस घरात डांबून ठेवले. त्यानंतर लोणावळा येथील एका व्यक्तीला तिची ११ हजार रुपयांना विक्री केली.

पुणे - मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या १४ वर्षांच्या मुलीला ओळखीच्या एका महिलेने काही दिवस घरात डांबून ठेवले. त्यानंतर लोणावळा येथील एका व्यक्तीला तिची ११ हजार रुपयांना विक्री केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना पाठिशी घालत आम्हालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. ही घटना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चिखली येथे घडली. पीडित मुलीची आई खानावळीमध्ये काम करते; तर वडील मजुरी करतात. ही मुलगी आठवीत शिकत आहे. ती तिच्या घराजवळ राहणाऱ्या मैत्रीणीच्या घरी रोज जात होती. २३ डिसेंबरलाही ती मैत्रिणीकडे गेली; परंतु माघारी आली नाही. मुलीच्या आईने संबंधित महिलेस विचारणा केली अखेर मुलीच्या आईने त्या महिलेला पोलिसांत जाण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने मुलगी लोणावळा येथील एका व्यक्तीकडे असल्याची माहिती दिली.

पुणे : चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

दरम्यान, मुलीचे आई-वडील चिखली चौकीमध्ये गेले त्या वेळी पोलिसांनी मुलीची लोणावळ्याजवळील मळवली येथील बंगल्यातून एका व्यक्तीच्या तावडीतून सुटका केली.

यात्रेला निघालेल्या बाप-लेकीवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

मुलगी बेपत्ता झाल्यापासून आम्ही चिखली पोलिसांकडे दाद मागत होतो; परंतु त्यांनी आरोपींना अटक करण्याऐवजी आम्हालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत.   
- पीडित मुलीचे वडील

पुण्यात माणुसकीला काळीमा; लोंखडी रॉडने मारल्याने कुत्र्याचा मृत्यू
 

मुलगी सापडल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी ससूनमध्ये करण्यात आली आहे. हे प्रकरण शुक्रवारी माझ्याकडे आले असून, त्याचा तपास पूर्ण झाल्याशिवाय अधिक सांगता येणार नाही.
- राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Human trafficking in pune minor girl eleven thousand