हडपसरमध्ये 'माणुसकीची भिंत'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

हडपसर - 'माणुसकीची भिंत' ही चळवळ आता हडपसमध्ये सक्रिय झाली आहे. शहीद भगतसिंग ट्रस्ट व व्हिजन हडपसर या दोन संस्थांच्या माध्यमातून युवा कार्यकर्ते संघटित झाले आहेत. "नको असेल ते द्या.. हवे असेल ते घेऊन जा,' असा संदेश कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे. हडपसर पोलिस ठाण्याजवळील रिकाम्या जागेत ही भिंत असून, त्याला नागरिकांकडून वस्तू लटकविल्या आहेत. वस्तू देणारे व घेणारे यांचा या उपक्रमाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय मोरे म्हणाले, ""केवळ भिंत तयार करून आमचे कार्यकर्ते थांबत नाहीत. त्याच्या जोडीला नागरिकांनी आपल्याला नको असलेले, पण चांगल्या स्थितीतील कपडे, स्वेटर, वह्या, चादर, ब्लॅंकेट, चप्पल, खेळणी, पुस्तके आणि अन्य वस्तू या भिंतीवर आणून ठेवाव्यात, असे अवाहन घरोघरी जाउन कार्यकर्ते गोपीनाथ पवार, सतीश जगताप, अनिल मोरे, विशाल ढोरे, चॉंद शेख करत आहेत. ज्या गरजू व्यक्तींना भिंतीवरील वस्तू हव्या असतील, त्यांना त्या दिल्या जात आहेत. अनेक जण जुने कपडे अनाथाश्रमात पोचवतात, पण अनाथाश्रमातील त्या अनाथांना या सगळ्या कपड्यांची गरज असतेच, असे नाही. कित्येकदा गरजेपेक्षा अधिकचा साठा किंवा गरज नसणाऱ्या वस्तूदेखील त्यांच्यापर्यंत पोचतात. त्यामुळे या पारंपरिक पद्धतीला फाटा देणाऱ्या उपक्रमात नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.''
या उपक्रमाचे उदघाटन पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी नगरसेवक चेतन तुपे, विजय मोरे, पल्लवी सुरसे, सविता मोरे, प्रशांत सुरसे, डॉ. आबा धारवडकर, डॉ. शंतनू जगदाळे उपस्थित होते.

शहिद भगतसिंग ट्रस्टच्या वतीने सोसायट्यांमधील जुन्या सायकली गोळा करून गरजू शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे दूरवर पायी शाळेत जाणाऱ्यांना मदत होणार आहे. इच्छुकांनी ट्रस्टकडे सायकली जमा कराव्यात, असे अवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Humanity wall in Hadapsar