मांजरीत शेकडो झाडांची तोड

मांजरीत शेकडो झाडांची तोड
मांजरीत शेकडो झाडांची तोड

मांजरी (पुणे): मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नवीन कालव्यालगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या सुमारे सहा एकर जागेत वाढवलेली सुमारे 256 विविध प्रकारची झाडे काही अज्ञात व्यक्तिंकडून तोडण्यात आली आहेत. बुधवारी मध्यरात्री दरम्यान हा प्रकार घडला. त्याबाबत सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पाटबंधारे विभागाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाटबंधारेच्या या जागेलगत विंटेज व्हिस्टा सोसायटी व परमार इंडस असोसिट्स अशा दोन सोसायट्या आहेत. या सोसायट्या व कालव्या दरम्यान पाटबंधारे खात्याची सुमारे सहा एकर जमीन आहे. त्याठिकाणी या सोसायट्यांनी पाटबंधारे विभागाच्या संमतीने सामाजिक उपक्रमांतर्गत आवळा, चिंच, बदाम, जांभुळ, उंबर, सिताफळ आदी प्रकारची सुमारे तीनशेच्यावर झाडे तीन वर्षापूर्वी लावलेली आहेत. त्याची देखभालही त्यांच्याकडून केली जात आहे. ही झाडे सुमारे पंधरा फूटापर्यंत वाढलेली आहेत. त्यातील 256 झाडे काही अज्ञात व्यक्तिंनी तोडून टाकली आहेत. सोसायटीतील एका नागरिकाला झाडे तोडत असल्याचा आवाज आल्याने त्यांनी त्यांना हटकले. त्यानंतर संबंधीत व्यक्ती तेथून पळून गेल्या. दरम्यान सोसायटीने शंभर क्रमांकावर संपर्क साधून त्याबाबतची तक्रार दिली.

"आम्ही सर्वांनी तीन वर्षापासून या झाडांचे संगोपन करीत आहोत. पाणी, खते देवून त्यांना मुलांसारखे वाढवले होते. यापूर्वीही येथील जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काही व्यक्तिंनी केला होता. आताही झाडे तोडून या जागेवर कब्जा करण्याचा कुणाचा तरी प्रयत्न आहे. त्यामुळेच येथील झाडे तोडली आहेत. पोलीस व पाटबंधारे विभागाने संबधितांवर कारवाई करावी.''
- मनोज पाटील, अध्यक्ष, विंटेज व्हिस्टा सोसायटी

"पाटबंधारे खात्याच्या आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शाखा अभियंत्यांनी या घटनेची पाहणी केली आहे. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. हडपसर पोलीसठाण्यात तशी तक्रारही दाखल केली आहे.''
- विजय वाघमारे, अभियंता, पाटबंधारे मालमत्ता विभाग

"पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने पाटबंधारे विभागाच्या परवानगीने तीन वर्षांपूर्वी इथे या झाडांची लागवड केली आहे. त्यांचे सांगोपन करून परिसर स्वच्छ व हरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, विघ्नसंतोषी व्यक्तिंकडून असे कृत्य होऊ लागल्यास पर्यावरणाला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांवर परिणामकारक कारवाई झआली पाहिजे.''
- हिरेन परमार, संचालक, परमार इंडस असोसिट्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com