Pune : नाल्यातील उपोषणामुळे आरोग्य विभागला आली जाग!

लेखी आश्वासन नंतर राष्ट्रवादीचे नाल्यातील उपोषण मागे
hunger strike sitting drain health department
hunger strike sitting drain health departmentsakal

पिंपरी : आकुर्डी भागातील नाले सफाई वेळोवेळी होत नाही. आरोग्य विभागाला वारंवार सूचना देऊन देखील दखल घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने `नाल्यात बसून’ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषण स्थळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.

उपोषणाला माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, मनसेचे संघटक के. के. कांबळे आदींनी भेट दिली. तत्पूर्वी पहाटे लवकरच २५ ते ३० आरोग्य कर्मचारी नाल्यात उतरून साफ सफाई करून घेत असल्याचे दिसून आले.

hunger strike sitting drain health department
Pune : विमनस्क महिलेला मिळाला माणुसकीचा आधार!
hunger strike
hunger strikesakal

राष्ट्रवादीच्या उपोषणामुळे नाला स्वच्‍छता केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. यावेळी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे , आरोग्य निरीक्षक साळवे, आरोग्य सहायक शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

राष्ट्रवादीचे इखलास सय्यद यांनी ‘लेखी आश्वासन द्या, तरच मागे घेऊ ’ अशी भूमिका घेतल्यानंतर आरोग्य विभागाने सात दिवसाच्या आत सर्व नाले सफाई करून देऊ असे लेखी आश्वासन दिले. यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि ज्येष्ठ नगरसेवक विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या शिष्टाई केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

या उपोषणात ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा कुऱ्हाडे, अण्णा भोसले, प्रकाश परदेशी, फैज शेख, गौतम बेंद्रे, वसंत सोनार, यशवंत भालेराव, हरिभाऊ हांडे, चंद्रकांत इंगळे, सतीश सिलम, सुनील मोरे, नाल्यातील उपोषणामुळे आरोग्य विभागला आली.

hunger strike sitting drain health department
Pune : राज्यातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

सूरज मोरे, जिब्राईल शेख, रूपेश जोशी, किरण वाळुंज ,भास्कर म्हस्के, संजना सुर्वे, प्राजक्ता वाहळकर, विमल हांडे, अलका परदेशी, आशा साले, स्वाती म्हस्के,शोभा राऊत,अनिता पवार,मंगल खवले, अपेक्षा ठोंबरे, नीलम गडदे आदींनी सहभाग घेतला. सात दिवसात नाले सफाई न झाल्यास पुन्हा नाल्यात ५ दिवसाचे उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी इखलास यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com