राज्य सहकारी संघाच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण 99 व्या दिवशी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ सेवक कृती संघटनेचे साखळी उपोषण 99 व्या दिवशी सुरूच आहे. उद्या उपोषणाचा शंभरावा दिवस आहे.  सहकारी संस्थांनी संघाला शिक्षण निधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. परंतु कर्मचाऱ्यांचे 19 महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्याबाबत निर्णय न झाल्यामुळे उपोषण सुरूच राहील, असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

''दसरा, दिवाळी सणासुदीच्या दिवसांतही 19 महिन्यांपासून पगार नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालविणार, असा प्रश्न पडला आहे. ''
- दिनेश सोनाळेकर, सचिव, राज्य सहकारी संघ सेवक कृती समिती

Web Title: the Hunger strike of the state co-operative employees will begin on 99th day