निरवांगीमध्ये पाण्यासाठी नीरा नदीमध्ये उषोषण

strike
strike

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी कोरड्या नदीमध्ये आज (ता.२२) पासुन बेमुदत उपोषणाला सुरवात केली.

जानेवारी महिन्यापासून इंदापूर तालुक्यातील नीरा नदी कोरडी पडली असून कळंब पासुन नीरा नरसिंगपूरचपर्यंतच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी नाही. पाण्याअभावी नदीकाठच्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली अाहे. नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडू लागल्या असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. प्रशासनाने नदीमध्ये पाणी सोडावे यासाठी नदीकाठचे शेतकरी पाठपुरावा करत आहेत.

मात्र प्रशासन पाणी सोडण्यास विलंब करीत असल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २०) रास्तारोको आंदोलन केले होते. व आज गुरुवार (ता.२२) पासुन कोरड्या नदीमध्ये निरवांगी (ता. इंदापूर) येथे सरपंच दशरथ पोळ, खोरोची सरपंच संजय चव्हाण, धनंजय रणवरे, सुनिल रणवरे, शंकर होळ, दत्तात्रेय पोळ, सतिश हेगडकर, अमाेल रणवरे, दादासाहेब सुळ, समीर पाेळ, वैभव जाधव, चंद्रकांत फडतरे, दिलीप पवार, सुनिल कोकरे, अजिनाथ कांबळे, श्रीरंग रासकर यांनी  बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे. उपोषणकर्त्यांना नदीकाठच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांनी व महिलांनी पाठिंबा दिला अाहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पाटबंधारे विभागाचे आर.के.गुटगडे, लक्ष्मण सुद्रीक यांनी उपोषणकर्त्यांची भेट दिली.

शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ पाण्यासाठी मुंबईला..
निरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत रणवरे, वीरसिंह रणसिंग, विठ्ठल पवार, रवींद्र पोळ, दादासो वाघमोडे, छगन जाधव, नितीन जाधव, शेखर फडतरे, नानासो कुलकर्णी, बापू नगरे, गजानन रुपनवर यांनी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रेय भरणे यांची भेट घेऊन निरा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली. माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील जिल्हाअधिकारी यांना फोनवरून संपर्क करून पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. व दोन दिवसामध्ये पाणी सोडण्यावरती मार्ग काढणार असल्याचे छत्रपती कारखान्याचे संचालक अभिजीत रणवरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com