पत्नीला अश्लील एसएमएस पाठविणाऱ्या पतीवर गुन्हा 

संदीप घिसे 
सोमवार, 21 जानेवारी 2019

याबाबत ३५ वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी, (पुणे) : पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे संतापलेल्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही घटना पिंपरी येथे घडली.

याबाबत ३५ वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० डिसेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास आरोपी पतीने आपल्या पत्नीला अश्लील एसएमएस पाठवत तिच्या मनात लज्जा उत्पन्न करीत तिचा विनयभंग केला. उपनिरीक्षक हरिदास बोचरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: husband arrested for sent pornographic messages to his wife in Pimpri