पत्नीचा खून करून रेल्वेखाली उडी मारणार होता पण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

- अनेक वर्ष पत्नीला आजाराने ग्रासल्यामुळे बिंद्रा त्यांच्या आजारास कंटाळले होते
- आजारी पत्नीचा खुन केल्यानंतर वृद्ध पतीनेही आत्महत्या करण्याचे ठरविले
- रेल्वेखाली उडी मारून जीव देण्यासाठी त्यांनी पुणे रेल्वेस्थानक गाठले. पण आत्महत्या करण्याचे धाडस होईना

पुणे : आजारी पत्नीचा खुन केल्यानंतर वृद्ध पतीनेही आत्महत्या करण्याचे ठरविले, त्यासाठी घटनेनंतर ते तत्काळ तेथून बाहेर पडले. रेल्वेखाली उडी मारून जीव देण्यासाठी त्यांनी पुणे रेल्वेस्थानक गाठले. पण आत्महत्या करण्याचे धाडस होईना, म्हणून ते पुन्हा कॅम्पमधील एका धार्मिक स्थळी आले, तेथे दर्शन घेतले. त्यानंतर आता आत्महत्या करायचीच, असा निश्‍चय करुन ते तेथून बाहेर पडले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

हरविंदरसिंग केसरसिंग बिंद्रा (वय 71 फ्लॉवर व्हॅली सोसायटी, वानवडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर देविंदरकौर बिंद्रा (वय 66) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. हरविंदर बिंद्रा याच्या पत्नी देविंदरकौर या तब्बल 30 वर्षांपासून आजारी होत्या. बिंद्रा त्यांची सेवा सुश्रषा करीत होते. अनेक वर्ष पत्नीला आजाराने ग्रासल्यामुळे बिंद्रा त्यांच्या आजारास कंटाळले होते. त्यातुनच त्यांनी दोन दिवसांपुर्वी देविंदगौर यांचा चाकूने गळा कापून खुन केला. त्यानंतर आपणही आत्महत्या करण्यासाठी जात असल्याची चिठ्ठी लिहून ते शुक्रवारी पहाटे घराबाहेर पडले. 

तेथून रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या करण्याच्या उद्देशाने बिंद्रा रिक्षाने पुणे रेल्वेस्थानकावर आले. फ्लॅटफार्म क्रमांक पाचवर जाऊन थांबले. रेल्वेगाड्या येत-जात होत्या, त्याखाली जीव देण्याचा विचार त्यांच्या मनात येत होता. पण त्यासाठी धाडस होत नव्हते. अनेकतास तेथे घालवून अखेर कॅम्पमधील धार्मिक स्थळावर जाऊन दर्शन घेण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी ते कॅम्प परिसरात आले. त्यांनी धार्मिक स्थळी दर्शन घेतले. आता मात्र त्यांनी आत्महत्या करण्याचा पक्का विचार केला. त्यानंतर ते बाहेर पडले. त्याचवेळी दोन दिवस शोध घेणारे वानवडी पोलिसांचे पथकाने त्यांना ताब्यात घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband couldn't suicide after wife's murder