भिंतींवर डोके आपटून पतीने केला पत्नीचा खून; अपघाताचा केला बनाव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

राजेश हा पत्नी संगीता यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद होत. १७ जानेवारी रोजी रात्री त्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटले.

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचे डोके भिंतींवर आपटून तिचा खून केला. मात्र स्वतःला वाचविण्यासाठी हा खून नसून अपघात असल्याचे पोलिसांना पटवून देण्यासाठी पतीने स्वत:चेही डोके भिंतीवर आपटून घेतले. मात्र शवविच्छेदन अहवालातून व पोलिस तपासातून पतीचा बनाव उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगीता राजेश सोनी (वय २२, रा. सागर बिल्डींग, गंगानगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा पती राजेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नवीन जनाला (वय २५,रा. पिंपरी) यांनी यासंदर्भात हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हा पत्नी संगीता यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद होत. १७ जानेवारी रोजी रात्री त्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर मारहाण करून तिचा खून केला. मात्र स्वतःला वाचविण्यासाठी त्याने हा सर्व प्रकार अपघात वाटावा म्हणून स्वत:चे डोके भिंतीवर आपटून घेतले. त्यानंतर त्याने संगीताला रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच संगीता यांचा मृत्यू झाला होता. दुचाकी घसरून अपघात झाल्याचे त्याने डॉक्टर आणि पोलिसांना सांगितले होते.

15 वर्षे स्त्री म्हणून जगली, आता कळलं पुरुष आहे

रूग्णालयातील डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शवविच्छेदन अहवालात संगीताला बेदम मारहाण करून तिचा खून झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पती राजेशविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक विश्वास भाबड तपास करत आहेत. पोलिसाच्या अंगावर गा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The husband killed his wife by beating her head on the wall