दारूच्या नशेत पतीचा पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

किरकोळ  कारणावरुन पत्नीसोबत भांडण करणाऱ्या मद्यपी पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन खून केला. ही घटना पुण्यातील मंहम्मदवाडी परिसरात वाडकर मळ्यात घडली. 

पुणे : किरकोळ  कारणावरुन पत्नीसोबत भांडण करणाऱ्या मद्यपी पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करुन खून केला. ही घटना पुण्यातील मंहम्मदवाडी परिसरात वाडकर मळ्यात घडली. 

संगीता श्रीकांत चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर पती श्रीकांत फरार झाला आहे, याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पतीचा शोध घेत आहेत. श्रीकांतला दारूचे व्यसन आहे. रविवारी (ता. 30) रात्री तो दारू पिऊन घरी आला. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केला. त्यानंतर तो पळून गेला.

Web Title: Husband kills his wife at Pune