पुण्यात बुधवार पेठेत पतीनेच केला तिचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

किरकोळ कारणावरुन पत्नीचा खून करुन पती पळून गेला. बुधवार पेठेतील जुना बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर बुधवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. वेश्या व्यवसाय करणारी मिना गब्बर काजी शेख (वय ३०) हिच्या खुनाच्या आरोपावरून तिचा पती इनामुल्ल मलीक शेख (वय ३२) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल  झाला आहे

पुणे : किरकोळ कारणावरुन पत्नीचा खून करुन पती पळून गेला. बुधवार पेठेतील जुना बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर बुधवारी सकाळी ७ वाजता ही घटना घडली. वेश्या व्यवसाय करणारी मिना गब्बर काजी शेख (वय ३०) हिच्या खुनाच्या आरोपावरून तिचा पती इनामुल्ल मलीक शेख (वय ३२) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल  झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मिना व शेख हे दोघेही पश्चिम बंगालमधील राहणारे आहेत. मिना ही गेल्या काही वर्षापासून वेश्या व्यवसाय करीत होती गेल्या दीड महिन्यापासून बुधवार पेठेतील जुन्या बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरील एका खोलीत हे दोघे पतीपत्नी म्हणून राहात होते. शेख हा काही कामधंदा करीत नव्हता. त्यातून त्यांच्यात काही वेळा बाचाबाची झाली होती.

आज सकाळी सातच्या सुमारास त्यांमध्ये भांडणे झाली, तेव्हा रागाच्या भरात इनामल्ला शेख याने मिनाच्या गळ्यावर, पायावर चाकूने वार केले. मिनाचा आवाज ऐकून तेथे अनेक जण जमा झाले, हे पाहून हा शेख तेथून पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मिनाला तेथील मुलींनी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. 
फरासखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर नावंदे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband murdered prostitute wife by stabbing knife