प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

वाई - पसरणी घाटात काल (ता. २) नवदांपत्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून झालेल्या खुनाचा पोलिसांनी २४ तासांत छडा लावला. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दीक्षा कांबळे व तिचा प्रियकर निखिल सुदाम मळेकर (वय २४, रा. चिखली, जि. पुणे) या दोघांना आज अटक केली. यातील इतर चार मारेकरी अद्याप फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.

वाईचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. काळेवाडी (पुणे) येथील फिर्यादी राजेश बोबडे, त्यांची पत्नी कल्याणी आणि मित्र आनंद कांबळे त्यांची पत्नी दीक्षा असे चौघे मोटारीने महाबळेश्वरला निघाले होते. दुपारी पसरणी घाटात दीक्षाला उलटी होवू लागल्याने गाडी थांबवली. त्याचवेळी पाचगणीहून दोन दुचाकीवरून आलेल्या चार युवकांपैकी दोघांनी आनंदवर  कोयत्याने वार करून खून केला. 

हल्लेखोरांना अटक करा
औंध - रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज आनंद कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्‍याचप्रमाणे हल्लेखोरांना त्‍वरित अटक करण्याची  मागणी केली.

या वेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, पश्‍चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, रमेश ठोसर, महादेव साळवे आदी उपस्थित होते.

दीक्षाने दिली गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी दीक्षाकडे कसून चौकशी केली. त्या वेळी तिने प्रियकर निखिल मळेकरच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी पुण्यात जाऊन निगडी येथून निखिल मळेकरला ताब्यात घेतले. त्याने इतर चार जणांच्या मदतीने आनंदचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दीक्षा कांबळे व निखिल मळेकर या दोघांनी कट करून संगनमताने सुपारी देऊन आनंदचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. 

Web Title: Husband murdered wife with the help of a boyfriend