जवानाचा पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने खून

महेंद्र शिंदे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

खेड शिवापूर येथे पाच दिवसांपूर्वी आढळलेला मृतदेह सुटीवर आलेल्या जवानाचा असून, पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केला असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. 

खेड शिवापूर (पुणे) : येथे पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या संजय भोसले यांच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात राजगड पोलिसांना यश आले आहे. भोसले यांच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. 

याबाबत राजगड पोलिसांनी शीतल संजय भोसले (वय 29, रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा), योगेश कमलाकरराव कदम (वय 29, रा. रहाटणी, पिंपरी चिंचवड), मनीष नारायण मदने (वय 32, रा. काळेवाडी, पिंपरी चिंचवड), राहुल अशोक काळे (वय 35, रा. नखातेनगर, थेरगाव, पिंपरी चिंचवड) या चौघांना ताब्यात घेतले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय भोसले हे सैनिकात होते. सध्या ते काळेवाडी-रहाटणे येथे राहायला होते. त्यांचे वय पत्नी शीतल हिच्यापेक्षा दहा वर्षांनी जास्त होते. शीतल हिचे योगेश कदम याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे संजय आणि शीतल या दोघांत कायम वाद होत होते. संजय हे ऑक्‍टोबर महिन्यात सुटीवर आले होते, त्या वेळी त्यांच्यामधील वाद वाढला. त्यामुळे शीतल हिने योगेश याच्या मदतीने संजय याचा काटा काढायचे ठरवले.

त्यानुसार 7 नोव्हेंबरला रात्री योगेश याने शीतल हिला सोडिअम साइनाईडची गोळी दिली. शीतल हिने पाण्यातून ती गोळी संजय यांना दिली. त्यात संजय यांचा मृत्यू झाला. त्यानंतर योगेश याने मनीष मदने व राहुल काळे या दोघांच्या मदतीने संजय यांचा मृतदेह पुणे- सातारा रस्त्यावर खेड शिवापूर येथे टाकून दिला. मात्र, राजगड पोलिसांनी तपासात शीतल हिची चौकशी केली. मात्र, तिच्या जबाबात विसंगीत आढळून आली. त्यामुळे तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यावरून पोलिसांनी तिची आणखी चौकशी केली. त्यात तिने गुन्ह्याची कबुली दिली. 

राजगडचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार सुधीर होळकर, दिनेश कोळेकर, महादेव कुतवळ, गणेश लडकत, नरेश येमूल यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सदर प्रकार वाकड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, आरोपींना वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband murdered by wife with the help of a lover

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: