दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर पतीने झाडली गोळी

4firing_0.jpg
4firing_0.jpg

पुणे : दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर पतीने पिस्तुलातुन गोळी झाडली. गोळी  चाटुन गेल्यामुळे महिला किरकोळ जखमी झाली. शुक्रवारी ताड़ीवाला रस्ता परिसरात  हा घटना घडली.  पतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे. 

कडूबाई बालाजी चाथे (वय ४२, रा. सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रस्ता) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रकरणी मुलगा योगेश चाथे याने पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन बालाजी चाथे (वय ४६) याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी यास दारुचे व्यसन आहे.

शुक्रवारी बालाजी दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी पत्नी कडूबाई यांनी त्यास दारू न पिण्याबाबत सुनावले. त्यामुळे संतप्त होउन पतीने भांडण सुरु केले. दारूच्या नशेतच त्याने पत्नीवर  पिस्तुलातुनमधून गोळी झाडली. गोळी कडुबाई यांना चाटुन गेल्यामुळे त्या किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान पती बालाजी याने तेथून पळ काढला.

या घटनेनंतर माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, पोलिस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी बालाजीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक घाग तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com