पतीच्या ‘लाइफस्टाइल’मुळे पोटगीच्या रकमेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

पुणे - पत्नीला द्यावयाची पोटगीची रक्कम ठरविताना पतीच्या ‘लाइफस्टाइल’चाही विचार केला पाहिजे, असे सांगत कौटुंबिक न्यायालयाने एका प्रकरणात महिलेला महिन्याला मिळणारी रक्कम ३५ हजारांवरून ५० हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. पत्नी व त्यांच्या दोन मुलींनी दाखल केलेल्या अर्जावर कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश लक्ष्मण मगदूम यांनी नुकताच हा आदेश दिला. 

पत्नीने पतीविरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ्‍अर्जातील माहितीनुसार, पती हे एका कंपनीमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पुण्यात बाणेर व शिवाजीनगर; तसेच मुंबईत महालक्ष्मी भागात फ्लॅट असून ते भाड्याने दिलेले आहेत; तसेच ते ऑडी मोटार चालवतात व त्यांना विविध प्रकारच्या गुंतवणुकीतून दर महिना ठराविक रक्कम मिळते. 

त्यांच्या आई-वडिलांचा गणेशखिंड रस्त्यावर पेट्रोल पंप आहे. त्यांना दोन मुली असून, त्या बारावी आणि नववीत शिकतात. पतीचे वार्षिक उत्पन्न, खर्च बघता न्यायालयाने पत्नीला दरमहा पन्नास हजार रुपये द्यावेत, असा आदेश दिला; तसेच खटल्याचा खर्च म्हणून पंचवीस हजार रुपये देण्यात यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अर्जदाराच्या वतीने ॲड. भरत मोरे यांनी काम पाहिले.

Web Title: Husband's alimony in the amount of growth lifestyle