पुणे : औद्योगिक सिलिकॉन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती

एनसीएलचे डॉ. पुतला सुदर्शनम व चीनच्या शास्त्रज्ञांचे संशोधन
Hydrogen
Hydrogensakal

पुणे : भविष्यातील शाश्‍वत इंधनाचा स्रोत म्हणून हायड्रोजन (Hydrogen)वायुकडे पाहिले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर अनेक ठिकाणी हायड्रोजन विद्युत घटावर चालणारी वाहनेही रस्त्यावर आली आहेत. मात्र, पर्याप्त आणि स्वस्तात हायड्रोजनचा पुरवठा करणारी यंत्रणा अजूनही उपलब्ध नाही. त्यासाठी जगभरातील शास्रज्ञ संशोधन करत असून, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि चीनच्या (China)गुइझोइउ विद्यापीठातील शास्रज्ञांनी औद्योगिक सिलिकॉन (Silicon)कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीचा नवा पर्याय मांडला आहे.

Hydrogen
पुणे : अल्पयवीन मुलीची खासगी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी

एनसीएलचे डॉ. पुतला सुदर्शनम, चीनमधील प्रा. हु ली आणि प्रा. सॉन्ग यांचे हे संशोधन ग्रीन केमिस्ट्री या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा आणि सिलिकॉन उद्योगांतून मिळणारे सिलिकॉन कचरा, पाणी आणि हरित विद्राव्य घटक यांच्या अभिक्रियेतून हायड्रोजन निर्मितीची प्रभावी पद्धत शोधल्याचे शास्रज्ञ सांगतात. प्रयोगशाळेत सिद्ध झालेले हे संशोधन हायड्रोजनच्या निर्मितीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.(Pune news)

Hydrogen
बेळगाव : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालये अतिथी प्राध्यापकांवरच अवलंबून

संशोधनाचे फायदे

  • इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा शाश्‍वत पर्याय उपलब्ध

  • औद्योगिक पातळीवर हायड्रोजनची निर्मिती

  • पर्यावरणपुरक हायड्रोजन निर्मितीचा पर्याय

  • सिलॅनॉल्स आणि सिलिल इथर सारखी उत्पादने मिळतात

    संशोधनाच्या मर्यादा

  • प्रयोगशाळेतील हे संशोधन प्रत्यक्ष वापरासाठी औद्योगिक सहभाग आवश्यक

  • या पद्धतीची शाश्‍वतता सिलिकॉन कचऱ्याच्या शुद्धतेवर अवलंबून आहे

    सिलिकॉन कचरा मिळण्याची ठिकाणे

  • काच, ट्रान्झिस्टर, इंटिग्रेटेड सर्किट्स आणि मुद्रित सर्किट बोर्डचे कारखाने

  • घरे अथवा आस्थापनांतील इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-कचरा)

Hydrogen
सातारा : मांढरदेव यात्रा रद्द, यात्रेनिमित्त जमावबंदी लागू

भारताचे वार्षिक हायड्रोजन वापर (दशलक्ष मेट्रीक टनामध्ये)

  • वापराचा प्रकार - २०२१ : २०३० (अपेक्षीत)

  • तेल शुद्धीकरण कारखाने - ३.६ : ६.८

  • खतांसाठी अमोनियाचे उत्पादन - ३.१ : ४.६

  • इतर वापरासाठी उपलब्ध नाही - ०.३

(स्रोत : केंद्रीय मंत्रीमंडळासमोरील ड्राफ्ट)

असे आहे संशोधन

  • इलेक्ट्रॉनिक कचरा किंवा सिलिकॉन उद्योगांतून पॉलिमेथिल हाइड्रोसिलॉक्सेन नावाचा घटक मिळतो

  • पाणी आणि हायड्रोसलाईनची अभिक्रिया वाढविण्यासाठी सायकलिक युरिया हा हरित विद्राव्य घटक वापरण्यात येतो

  • वरील द्रावणाची पॉलिमेथिलहाइड्रोसिलॉक्सेनशी अभिक्रिया होऊन हायड्रोजन मिळतो

  • सर्वसामान्य तापमानाला उत्प्रेरक न वापरता आपल्याला हायड्रोजन मिळतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com