खामुंडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार

पराग जगताप
बुधवार, 3 एप्रिल 2019

खामुंडी ता.जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी बी.सी.येळे यांनी दिली.

ओतूर ता.जुन्नर : खामुंडी ता.जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी बी.सी.येळे यांनी दिली.

नगर कल्याण महामार्गावर आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास खांमुडी गावच्या हद्दीत रस्त्यावर अपघातग्रस्त तरस पडलेले असल्याची माहिती वनविभागाला फोनवर मिळाली. त्यानुसार वनपाल व्ही. आर. अडागळे, वनरक्षक एस.ए.राठोड व वनकर्मचारी यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केेेेला. सदर तरस मादी जातीचे व अंदाजे दोन वर्ष वयाचे होते. तरसाच्या मृतदेहावर उदापूर रोपवाटिके आणून वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी अशोक धिंदाळे यानी शवविच्छेदन केले व नंतर तरसाच्या मृतदेहाचे दहन करण्यात आला.

दुष्काळी परिस्थीती व वाढती उष्णता यामुळे वन्यप्राणी अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. तरी वाहनचालकांनी रस्तावर वाहन चालवताना कोणत्याही प्राण्यास इजा पोहचू नये, यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन वन्यजीव प्रेमीकडून केले जात आहे.

Web Title: Hyena Died in Accident in Khamundi Junnar