जिममध्ये स्वच्छतेचे "वर्कआऊट'; दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार

gym
gym

पुणे - "अनलॉक'च्या प्रक्रियेतून वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले. परंतु राज्यात जिमच्या परवानगीसाठी तब्बल आठ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिम होत असून त्यासाठी साफसफाई, निर्जंतुकीकरण आणि जिम मधील उपकरणांच्या दुरुस्ती व देखभालीची कामे सुरू झाली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"जिममध्ये येणाऱ्यांना संसर्गाचा धोका होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. सध्या आर्थिक अडचण असल्यामुळे सदस्यांना नव्याने मेंबरशिप घेण्याचे आवाहनही आम्ही करत आहोत,' असे पुणे फिटनेस क्‍लब असोसिएशनचे अध्यक्ष व ब्राऊन फिटनेसचे नीलेश काळे यांनी सांगितले. इतके दिवस जिम बंद असल्याने आता उपकरणांची दुरुस्ती करत आहोत. संपूर्ण जिम सॅनिटायझ करून ठेवले आहे. तसेच प्रत्येक बॅचमध्ये केवळ 5 ते 7 लोकांनाच परवानगी देणार आहोत. सर्व जिम ट्रेनर आणि कर्मचारी हे सुरक्षित अंतर ठेवून व्यायामाचे प्रशिक्षण देतील,' असे जिम व्यावसायिक सागर शिंदे यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वर्कआऊट हा फक्त जिममध्येच शक्‍य आहे. "वर्क फ्रॉम होम' असल्याने घरातूनच काम करत आहे. दिवसभर एकाच जागी बसून काम करत असल्याने माझे वजनही वाढले आहे. घरातून वर्कआऊट करायचे ठरवले, समाज माध्यमांवर व्हिडिओ पाहिले पण घरातील काम आणि ऑफिस या दोन्हीमुळे वेळ देता येत नव्हता. त्याचबरोबर घरात तशी साधनेही नाहीत. आता जिम सुरू होत असल्याने किमान स्वतःला वेळ देता येईल. 
- प्रियांका सुखदेवे, आयटी कर्मचारी 

अशी घेतली जाईल काळजी 
- प्रत्येक वापरानंतर जिममधील सर्व उपकरणांचे सॅनिटायझेशन 
- जिममध्ये येणाऱ्यांना मास्क आवश्‍यक 
- जिमच्या जागेनुसार एकावेळी केवळ 5 ते 10 सदस्यांना परवानगी 
- जिममध्ये प्रवेश घेताना आणि बाहेर पडताना सॅनिटायझेशनसाठी सुविधा उपलब्ध 
- जिममध्ये प्रवेश करताना शरीराचे तापमान तपासणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com