मैं लखनौका स्वयंसेवक हूँ  : वाजपेयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पुणे : "पुण्यात मोतीबागेत भरणाऱ्या शाखेचा मी मुख्य शिक्षक होतो. 1956 चा डिसेंबरचा महिना होता. पुण्यात जनसंघाचे अधिवेशन भरले होते. जनसंघाचे राष्ट्रीय नेते पुण्यात आले होते. त्यात अटलबिहारी वाजपेयीदेखील होते. ते संघाच्या गणवेशात शाखेवर आले.

मुख्य शिक्षक म्हणून शाखेचे संयोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शाखा भरल्यावर आम्ही एकमेकांचा परिचय करून दिला. अटलजींनी देखील स्वतःचा परिचय करून देऊ लागले. ते म्हणाले, ""मेरा नाम अटलबिहारी वाजपेयी है. मैं लखनौ का स्वयंसेवक हूँ. यहॉं पुणेमें जनसंघ के अधिवेशन के लिए आया हूँ'' वाजपेंयींनी स्वतःहून त्यांचा परिचय अतिशय उत्साहात करून दिला. पुढे मी लातूरला गेलो. तेथे विवेकानंद रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजनदेखील वाजपेयी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते औपचारिक व अनौपचारिक भेटीसाठी पाच वेळा लातूरला आले होते. तेव्हा ते आमच्या घरीदेखील राहिले होते.''  अशी आठवण लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे  संस्थापक डॉ. अशोक कुकडे यांना 'सकाळ'शी बोलताना सांगितली.

Web Title: I am a Lucknow Swayamsevak