मी कोणत्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही  - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सोशल इंजिनिअरिंग सुरू असून, जैन समाजात असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी मंगळवारी केला. मी कोणत्याही धर्म, जातीच्या विरोधात नाही, असे नमूद करीत प्रत्येकाने त्याचा धर्म, जात हा रस्त्यावर आणू नये, अशी भूमिका असल्याचे त्यांनी मुकुंदनगर येथील एका सभागृहात आयोजित सभेत स्पष्ट केले. 

पर्युषण पर्वात मांसविक्रीवरून निर्माण झालेल्या वादात जैन समाज हा मनसेवर नाराज झाला होता. त्याचप्रमाणे अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनला विरोध केल्याने राज ठाकरे हे जैन, गुजराथी समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांनी जैन समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पुण्यात केला. यापूर्वी त्यांनी बोरीवली येथे जैन समाजाशी संवाद साधला आहे. पुण्यात मुक्कामासाठी आल्यानंतर ठाकरे हे विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक यांची भेट घेत आहेत, तर काही त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मुकुंदनगर येथे बुधवारी सायंकाळी जैन समाजातील काही लोकांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. सुमारे दीडशे ते दोनशे जण या वेळी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ""ते पंतप्रधान झाले पाहिजे हे मी प्रथम बोललो होतो. आज ते चुकत आहेत, हेदेखील मीच प्रथम सांगत आहे. कोणत्याही देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती आले, की त्यांना अहमदाबादलाच का नेले जाते? त्यांना मुंबई किंवा इतर शहरात का नेले जात नाही? अहमदाबादमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढविली होती, तेव्हा सगळे तिकडे लक्ष होते. केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आठ दिवस तिकडे कोणीच फिरकले नाही, असा भेदभाव करणे योग्य नाही. नोटाबंदी, जीएसटी याचा फटका तुम्हाला बसला, तरीही तुम्ही काहीच बोलत नाही.'' तत्पूर्वी सुभाष राणावत, राजेश शहा, संकेत शहा, रोशन ओसवाल, राजेश परमार यांनी त्यांचे स्वागत केले.

Web Title: I am not against any caste and religion says Raj Thackeray