व्हॅलेंटाइन डे : मी वेगळी नाही, 'स्पेशल'! (व्हिडीओ)

I am not different I am special valentines day special interview of transgender
I am not different I am special valentines day special interview of transgender

पुणे : 'मी जसजशी मोठी होत गेले तसे मला कळत गेले की मी वेगळी नाही, विशेष आहे. तेव्हापासून आयुष्यात प्रत्येक गोष्ट विशेषच करत गेले. आरशासमोर उभे राहून स्वतःला पाहताना आपण चुकीच्या शरीरात बंदिस्त आहोत, असे वाटायचे. पण, ते खरे नसून चुकीच्या समाजात बंदिस्त असल्याची जाणीव झाली,' असे मत देशातील पहिला जाहीर तृतीयपंथी विवाह करणारी माधुरी सरोदे-शर्मा हिने व्यक्त केले.

'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने 'राइट टू लव्ह'च्या वतीने आयोजित प्रेमोत्सव कार्यक्रमात माधुरी बोलत होती. यावेळी पत्रकार रवींद्र आंबेकर, 'एलजीबीटी' समूहांसाठी काम करणारे जमीर कांबळे, माधुरी यांचे पती जय शर्मा, 'राइट टू लव्ह'चे समन्वयक अभिजित कांबळे, मयूरी जोशी, सुशांत सोनोने आदी उपस्थित होते. यावेळी आंतरजातीय व धर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक तरुणांनी त्यांची मनोगते व्यक्त केली. 

जमीर कांबळे म्हणाले, "आपल्या मनातील प्रेमाच्या भावना चित्रपटांमधून निर्माण झाल्या आहेत. प्रेम नक्की कशासाठी करायचे हे कोणीच सांगू शकत नाही. आपल्याकडे प्रेम लग्नासाठी, लग्न कुटुंबासाठी करायचे असते. आपले कुटुंब आणि प्रेम कसे असले पाहिजे हे जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या मनावर बिंबवले जाते.'' 


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com