Vidhan Sabha 2019 : लालू प्रसाद यादवांना जेलमध्ये पाठवणारा मीच : रवीशंकर प्रसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : ''कायदेमंत्री इतकीच माझी ओळख नाही तर, चारा घोटाळा करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रामजन्मभूमीची केस जिंकणारा वकीलही मीच आहे परंतु, माझी ही ओळख कुणीही करून देत नसल्याची,'' खंत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली.​

Vidhan Sabha 2019 : पुणे : ''कायदेमंत्री इतकीच माझी ओळख नाही तर, चारा घोटाळा करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात पाठवणारा वकील मीच आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रामजन्मभूमीची केस जिंकणारा वकीलही मीच आहे परंतु, माझी ही ओळख कुणीही करून देत नसल्याची,'' खंत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली.पुण्यात वकिलांच्या संघटनेने आयोजित केलेल्या 'संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते.

Ravi Shankar Prasad in pune

कलम 370 बाबत बोलताना ते म्हणाले, ''राहुल गांधी आणि शरद पवार यांनी कलम 370 चा एखादा तरी फायदा सांगावा. कलम 370 मुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद फोफावला. बेरोजगारी वाढली, महिला सुरक्षित नाहीत. काश्मीर खोऱ्याचा विकास रखडला आणि हेच कलम 370 आम्ही रद्द केले तर आमच्यावर टीका करत आहेत.''

Image may contain: 5 people, people standing

''भारत हा जगातील मोठा देश म्हणून पुढे येत आहे. जगाला भारताचा हेवा वाटतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात यशस्वी पंतप्रधान ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धाडसाने आणि प्रमाणिकपणे राज्य चालवित आहेत.''असेही त्यांनी यावेळी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am the one who sent Lalu Prasad Yadav to jail Said Ravi Shankar Prasad