होय, मला अभिमान आहे माझ्या वारशाचा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे - डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी या प्रभाग १४ (ड) मधून भाजपची उमेदवारी मिळालेल्या सिद्धार्थ शिरोळे यांनी संघ विचारसरणीचा, फर्ग्युसन महाविद्यालयाचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आपल्याला वारसा असल्याचे नमूद करून त्याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रत्युत्तर विरोधकांना दिले आहे.

अन्य राजकीय पक्षांतील विरोधकांकडून ‘खासदार पुत्र’ असा उल्लेख करून सिद्धार्थ शिरोळे यांचे नवखेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

त्यास प्रत्युत्तर देताना सिद्धार्थ म्हणाले, ‘‘संघाचा स्वयंसेवक, भारतीय जनता युवा मोर्चाचा सरचिटणीस म्हणून संघटनेचे आणि पक्षाचे काम मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आलो आहे. महत्त्वाचे म्हणजे मी नगरसेवकपदाकडे पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून बघत नाही. गेल्या दहा वर्षांत स्वतःच्या हिमतीवर, मोठ्या कष्टाने मी माझा व्यवसाय उभा केला आहे. एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नाव कमावले आहे. या प्रभागाचा आणि शहराचा विकास करण्याचे उद्दिष्ट घेऊन मी या निवडणुकीत उतरलो आहे.’’

वडील खासदार असल्याने प्रचारादरम्यान काही अडचण येते का? यावर सिद्धार्थ म्हणाले, ‘‘भाजपचे स्वच्छ, चारित्र्यवान आणि कार्यक्षम खासदार म्हणून अनिल शिरोळे यांची ख्याती आहे. त्यामुळेच माझे वडील हे माझ्यासाठी आदर्श आहेत. गेल्या ४० वर्षांपासून अत्यंत निष्ठेने पक्षाचे आणि संघाचे काम करताना मी त्यांना पाहिले आहे. त्या संस्कारातूनच मी माझे करिअर सांभाळत समाजकारण आणि राजकारणात उतरलो आहे.’’

सिद्धार्थ हे प्रभाग १४ मधील अन्य उमेदवार स्वाती लोखंडे (अ), नीलिमा खाडे (ब) आणि ज्योत्स्ना एकबोटे (क) यांच्यासह सध्या एकत्रित प्रचारावर आणि मतदारांच्या गाठीभेटींवर भर देत आहेत.

Web Title: I am proud of my heritage